सोयापेंड आयात करणार नाही मंत्री पियुष गोयलांचे रविकांत तुपकरांना आश्वासन. पण याबाबत लेखी आदेश काढा तुपकरांची आग्रही मागणी.
'स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकर यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री श्री. पियूष गोयल यांची आज दिल्ली येथील त्यांच्या संसदेतील कार्यालयात भेट घेतली. सोयापेंड आयातीचा घातकी निर्णय घेवू नका, अशी मागणी तुपकरांनी गोयलांना केली. यासोबतच सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या महत्वपूर्ण मागण्यांवर दोघांमध्ये विस्तृत चर्चा झाली.
यावर सोयापेंड आयातीचा केंद्र सरकारचा कोणताही इरादा नसल्याचे पियूष गोयल यांनी स्पष्ट केले पण यासंदर्भात लेखी आदेश काढावा, अशी आग्रही मागणी तुपकरांनी केली. जेणेकरून पोल्ट्री असोसिएशनच्या अफवांमुळे बाजारातील सोयाबीनच्या दरात घसरण होणार नाही.
पामतेल व खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढवा,सोयाबीनवरील 5% GST रद्द करा कापसावर निर्यातबंदी लावू
नका,कापसावरील आयातशुल्क कमी करू नका
ह्याही महत्वपूर्ण मागण्या आज रविकांत तुपकरांनी पियुष गोयल यांच्यासमोर ठेवल्या.
यामागण्यांसंदर्भातही केंद्र सरकार सकारात्मक असल्याचे आश्वासन श्री.गोयल यांनी दिले.
पोल्ट्री असोसिएशनच्या व साऊथच्या टेक्सटाईल लॉबीच्या दबावाखाली केंद्र सरकारने चुकीचे निर्णय घेवू नये
व लाखो सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करावा,अशी मागणी जोरकसपणे तुपकरांनी लावून धरली.
Share your comments