1. बातम्या

काय म्हणावे याला! शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांना कर्जरूपाने वितरित न करता ठेवीदारांच्या खिशात, विभागीय आयुक्तांना चौकशीचे आदेश

महात्मा फुले कर्ज माफी योजना चे नाशिक जिल्ह्यात 900 कोटी रुपये प्राप्त झाले होते. त्यापैकी 600 कोटी रुपये शेतकऱ्यांना कर्ज स्वरूपात पुन्हा वितरित करण्यात आले.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
disburse to debt forgiveness fund to depositers not farmer thats ndcc bank matter

disburse to debt forgiveness fund to depositers not farmer thats ndcc bank matter

महात्मा फुले कर्ज माफी योजना चे नाशिक जिल्ह्यात 900 कोटी रुपये प्राप्त झाले होते. त्यापैकी 600 कोटी रुपये शेतकऱ्यांना कर्ज स्वरूपात पुन्हा वितरित करण्यात आले.

उरलेली 300 कोटी रुपये शेतकऱ्यांना  कर्ज रूपाने वितरित करण्याचे आदेश असताना देखील ही रक्कम  शेतकऱ्यांना न देता ती बँकेच्या ठेवीदारांना देण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. याची गंभीर दखल नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतली असून या संपूर्ण प्रकाराची चौकशी  करून अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांना दिल्याने संबंधित अधिकारी तसेच बँकेचे तत्कालीन अध्यक्ष अन संचालक मंडळाचे धाबे दणाणले आहे. सोमवारी नऊ तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या खरीप हंगाम, जिल्हा क्रीडा विभाग आणि इतर महत्वाच्या बैठका झाल्या.

यावेळी ही गोष्ट समोर आल्यानंतर भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की महा विकास आघाडीचे सरकार राज्यात आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच अधिवेशनातमहात्मा फुले कर्ज माफी योजना राज्यात लागू केली यातून शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्ज माफ करण्यात आले. राज्य शासनाचे कर्जमुक्ती चे नियम डावलण्यात आल्याचा ज्यातून समोर आल्याने या प्रकाराची खंबीरपणे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दखल घेतली व चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांना दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:ब्रेकिंग : भर सभेत प्रांतअधिकाऱ्याची तक्रार थेट अजित पवारांकडे, आणि पुढे

नक्की वाचा:हटके उद्योग आयडिया! लाकडी घाण्यावरील तेल निर्मिती उद्योग देईल नवतरुण शेतकऱ्यांना भक्कम उद्योग आणि रोजगाराची संधी

नक्की वाचा:महत्वाची कायदेशीर माहिती! तुमच्या शेतात जाणारा रस्ता कोणी अडवला आहे तर नेमके काय करावे? काय आहे या संबंधीची कायदेशीर प्रक्रिया?

English Summary: disburse to debt forgiveness fund to depositers not farmer thats ndcc bank matter Published on: 10 May 2022, 06:13 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters