
Sugarcane Worker Update
बीड : जिल्ह्यात उसतोड कामगारांची संख्या खूप मोठी आहे. मात्र याबाबतची नोंदणी कमी आहे त्यामुळे या कामगारांच्या नोंदणीसह प्रधान्य द्यावे त्यासोबत या कामगारांच्या घरातील महिला आणि मुलींच्या आरोग्याची तपासणी होईल याचीही व्यवस्था करा, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गो-हे यांनी आज येथे दिले.
जिल्ह्यातील दौ-यात आज विविध विभागाच्या कामांचा आढावा त्यांनी आज घेतला यावेळी जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जिवने यांच्यासह विविध विभागाच्या प्रमुख अधिका-यांची उपस्थिती होती.
यापूर्वी त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याकडून महिला सुरक्षाविषयक बाबींचा एका बैठकित आढावा घेतला. मुली विशेषत: शालेय व महाविद्यालयीन मुलींना छेडछाड करण्याचे प्रमाण वाढले आहे यातच येथील एका मुलीने धाराशिव येथे आत्महत्या केली तिच्या कुंटुंबियांशी भेट घेऊन श्रीमती गो-हे यांनी या प्रकरणी न्याय मिळवून देऊ असे तिच्या कुंटुंबियास सांगितले. सदर मुलीच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मदतीसाठी आवाहन केले होते. त्या कुटुंबाला सांत्वनासह मदतीचे पूर्ण आश्वासन आज श्रीमती गो-हे यांनी दिले.
मुलींसाठी /महिलांसाठी मदत क्रमांक
कोणत्याही प्रकारची छेडछाड अथवा इतर स्वरुपाचा त्रास दिला जात असेल तर त्यासाठी स्वतंत्र असा whatsapp क्रमांक 92250 92389 जारी करण्यात आला आहे. यावर सर्वांना मदत मागता येईल तसेच तक्रार करता येणार आहे. ही माहिती पोलीस अधिक्षकांनी यावेळी दिली हा क्रमांक सर्व ठिकाणी पोहोचवा, असे निर्देश श्रीमती गो-हे यांनी दिले.
Share your comments