राज्यातील बांबू क्षेत्राच्या विकासासाठी बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान कंपनी स्थापन

08 August 2018 11:37 AM

राज्यातील बांबू क्षेत्राचा विकास करुन त्या आधारित उद्योगास चालना देण्यासह बांबूच्या मुल्यवर्धनासाठी सुनियोजित प्रयत्न करण्यासाठी “बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान, महाराष्ट्र” ही कंपनी स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्य शासन आणि टाटा ट्रस्टच्या सहकार्याने स्थापन करण्यात येणाऱ्या या कंपनीमुळे राज्यातील बांबूशी संबंधित क्षेत्र सक्षम होण्यास मोठी मदत होणार आहे.  

रोजगार निर्मितीसह संघटित बांबू बाजारास चालना देणे, उत्पादन, डिझाईन आणि विक्रीसाठी बांबूचे तीन क्लस्टर्स तयार करणे, बांबूचे मुल्यवर्धन करण्यासह उत्पन्न वाढवणे, घरबांधणी म्हणून बांबूचा वापर करण्यासाठी एक पथदर्शी गाव निर्माण करणे, बांबू अगरबत्ती प्रकल्प राबविणे, मार्केटिंगसाठी वास्तुविशारद व संकल्पचित्रकार यांच्याशी समन्वय, बांबूची गटलागवड करण्यास प्रोत्साहन, तरुण पिढीला बांबूचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणे, बांबूसाठी ज्ञान आणि माहिती केंद्र, लहानउद्योजक आणि व्यवसायासाठी सहाय्य म्हणून कार्य करणे अशी या प्रतिष्ठानची कार्ये राहतील.

राज्य शासनाने यापूर्वी चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली असून 6 ऑगस्ट 2016 रोजी महाराष्ट्र बांबू विकास मंडळ स्थापन केले आहे. बांबूला वाहतूक परवान्यातून सूट देण्यासह बांबू क्षेत्राचा विकास व वृद्धीसाठी धोरणात्मक शिफारशी करण्यासाठी 2017 मध्ये खास समितीची स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशीनुसार ना नफा तत्वावर “बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान, महाराष्ट्र” (Bamboo Promotion Foundation, Maharashtra) या कंपनीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य शासन आणि इतर संस्थांकडून प्रारंभिक कॉर्पस फंड घेऊन कंपनी सुरु होईल. तसेच कंपनीसाठी CSR निधीचाही वापर करण्यात येईल. त्यानंतर ही कंपनी स्वत:चे उत्पन्न आणि विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीतून स्वत:ला सुस्थापित करेल. एकवेळच्या 20 कोटी रुपयांच्या माध्यमातून या कंपनीमध्ये शासनाचा सहभाग राहील. तसेच टाटा ट्रस्टने 5 कोटी रक्कमेची हमी दिलेली आहे. भविष्यात इतर भागधारक कंपनीत जसजसे गुंतवणूक करतील त्यानुसार त्यांना सह सभासद म्हणून सहभाग घेण्यात येईल.

राज्यातील वनक्षेत्रापैकी जवळपास 13 टक्के क्षेत्र बांबू व्याप्त आहे. फॉरेट सर्वे ऑफ इंडिया अहवाल-2017 नुसार महाराष्ट्रातील बांबू क्षेत्रात गेल्या तीन वर्षात 4462 चौ.कि.मी.ने वाढ झाली आहे. बांबू क्षेत्राच्या व्याप्ती आणि विस्तारीकरणामध्ये देशामध्ये महाराष्ट्र राज्य वरच्या क्रमांकावर आहे.        

English Summary: Development of Bamboo area in the State Establishment Company Bamboo Promotion Foundation, Maharashtra

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.