1. बातम्या

नोकरी देण्याची मानसिकता विकसित करा: राष्ट्रपती कोविंद

IIM सारख्या संस्थांमधून शिकल्याने तुम्हाला उत्तम नोकरी आणि पगार मिळतो. मात्र नागपूर आयआयएमने नोकरी शोधणारी मानसिकता नव्हे तर नोकरी देण्याची मानसिकता विकसित केली पाहिजे, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले.

Develop a job-giving mentality: Kovind

Develop a job-giving mentality: Kovind

IIM सारख्या संस्थांमधून शिकल्याने तुम्हाला उत्तम नोकरी आणि पगार मिळतो. मात्र नागपूर आयआयएमने नोकरी शोधणारी मानसिकता नव्हे तर नोकरी देण्याची मानसिकता विकसित केली पाहिजे, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शहरातील मिहान परिसरात १३२ एकरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) कॅम्पसच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री डॉ.नितीन राऊत, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मि. डॉ. विकास महात्मे, कृपाल तुमाने यांच्यासह नागपूर आयआयएम संचालक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सी. पी. गुरनानी आणि संस्थेचे संचालक डॉ. भीमराय मैत्री यावेळी उपस्थित होते.

व्यावसायिकतेच्या दृष्टीने विविध नवीन क्षेत्रे समोर येत आहेत आणि अनेक नवीन मार्ग खुले झाले आहेत. शिक्षण, आरोग्य अशा काही महत्त्वाच्या क्षेत्रात हे नवे उपक्रम सुरू झाले आहेत. हा बदल देशासाठी निश्चितच गेम चेंजर ठरू शकतो कारण त्यातून रोजगार निर्मितीबरोबरच महसूलही मिळेल. नवकल्पना आणि उद्योजकता या दोन्हींमध्ये तुमचे जीवन आनंदी बनवण्याची क्षमता आहे, पण त्यासोबतच अनेकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचीही क्षमता आहे. नोकरी देणारे उद्योजक तयार करावेत असे आवाहन राष्ट्रपतींनी केले.

महत्वच्या बातम्या
चमोली जिल्ह्यात लागवड केली जाणारी हळद आहे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर, इतर हळदीपेक्षा आहे कर्क्युमिनची मात्रा अधिक
बातमी कामाची! मोदी सरकारच्या 'या' योजनेचा परिवारातील एकाहून अधिक सदस्याला मिळणार का लाभ; वाचा 

English Summary: Develop a job-giving mentality: Kovind Published on: 11 May 2022, 01:12 IST

Like this article?

Hey! I am शैलेश म्हातारदेव डमाळे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters