साध्या सरळ माणसाने राजकारण करू नये असे म्हटले जाते. आपण बघतोय की सध्या राजकारणाची पातळी खूपच खालावली आहे. सध्या साम दाम दंड वापरून राजकारण केले जाते. अनेकदा निवडून येण्यासाठी पैसे वाटले जातात. दबाव टाकला जातो, धमकी हाणामारी केली जाते. असे सध्याचे चित्र आहे. असे असताना पैसे वाटून अनेकजण निवडून येतात, तर काहीजण पडतात. मात्र वाटलेले पैसे कोणीही घेत नाही. मात्र आता वाटलेले पैसे चक्क परत घेतले गेले आहे.
यामुळे याची सध्या चर्चा सुरु आहे. निवडणूक हरल्यानंतर मतदारांकडून पैसे वसूल केल्याचा अनोखा प्रकार समोर आला आहे. ही घटना मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) नीमच जिल्ह्यातून समोर आली आहे. याबाबत सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये (Video Viral On Social Media) काही लोक गावकऱ्यांच्या घराचं दार ठोकावून त्यांच्याकडून पैसे वसूल करताना दिसत आहे. अशी घटना याआधी कधी घडली नसावी.
यामध्ये काही जणांना मारहाण करण्यात आली तर काहींना धमकी देऊन पैसे वसूल करण्यात आले. याचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सरपंच पदाच्या उमेदवाराविरोधीत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत हा विडिओ ग्रामपंचायत देवरानमधील सरपंच पदाचे उमेदवार राजू दायमा यांचा असल्याचे म्हटले जात आहे. चश्मा या निवडणुकीच्या चिन्हाअंतर्गत निवडणूक लढवणाऱ्या दायमा यांनी पैसे वाटून मतदारांना मतदान करायला सांगितले होते.
https://twitter.com/brajeshabpnews/status/1546783669268152320?s=20&t=Vg6sFOC6x-xIt1YaTntDUg
असे असताना मात्र प्रत्यक्षात निवडणुकीत दुसराच उमेदवार जिंकला. यानंतर राजू आणि त्यांचे समर्थक संतापले. यानंतर त्यांनी वाटलेल्या ठिकाणी ते पुन्हा पैसे वसूल करायला गेले, आणि लोकांना दमदाटी करून पैसे वसूल करू लागले. दरम्यान त्यांनी अवघ्या दीड ते दोन तासात त्यांनी साडे चार लाख रुपये वसूल केल्याचे उपस्थित लोकांनी सांगितले. याचा व्हिडीओ व्हायरल होताच एकच खळबळ उडाली.
धक्कादायक! मगरीने आठ वर्षांच्या मुलाला गिळले, पोटात मुलगा जिवंत असेल म्हणून..
यानंतर पोलिसांनी व्हायरल होणाऱ्या व्हिडीओची दखल घेत आरोपी राजू दायमाविरोधात मारहाण, धमकी देणे आदी गुन्हा दाखल केला आहे. सोबतच या व्हिडीओचाही तपास सुरू केला आहे. यामुळे आता लोकांनी देखील पैसे घेतला विचार करावा, अशाप्रकारे पैसे देऊन, तसेच अनेक गोष्टी घेऊन अनेक ठिकाणी मतदान केले जाते.
महत्वाच्या बातम्या;
याला म्हणतात खरी कृतज्ञता!! बेंदूर सणादिवशी बैलांचा त्रास कमी होण्यासाठी तयार केले अनोखे जुगाड
काय सांगता! लग्नानंतर रोज साडीच नेसावी लागणार, नवरीकडून त्याने कॉन्ट्रॅक्टवर सहीच घेतली
'स्वाभिमानी मिळवून देणार शेतकऱ्यांना ५० हजार, पूर असेल तर पोहत येऊन मोर्चात सहभागी व्हा'
Share your comments