1. बातम्या

शिल्लक ऊसाला हेक्टरी 75 तर ज्या शेतकऱ्यांचा उस जळीत करून गाळप केला त्यांना 25 हजार रुपये हेक्टरी अनुदान देण्याची मागणी

यावर्षी अतिरिक्त उसाचा प्रश्न हा बऱ्याच दिवसापासून गंभीर स्वरूप धारण करून उभा आहे. हा अतिरिक्त ऊस तोडण्यासाठी प्रशासनाने आणि सरकारनेदेखील शक्य ती पावले उचलली.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
demand to give twety five thousand subsidy per hector to farmer for extra cane crop

demand to give twety five thousand subsidy per hector to farmer for extra cane crop

यावर्षी अतिरिक्त उसाचा प्रश्न हा बऱ्याच दिवसापासून गंभीर स्वरूप धारण करून उभा आहे. हा अतिरिक्त ऊस तोडण्यासाठी प्रशासनाने आणि सरकारनेदेखील शक्य ती पावले उचलली. 

परंतु अजून सुद्धा 17 लाख टन अतिरिक्त ऊस शिल्लक असल्याचे राज्य सरकारने नुकतेच जाहीर केले.  ऊस तोडणी न झाल्यामुळे महाराष्ट्रात काही शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना देखील घडल्या. त्यामुळे या प्रश्नाने आणखीनच गंभीर स्वरूप धारण केले आहे.  याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या काही मागण्या सरकारकडे या अतिरिक्त उसा बाबत आहेत. अजूनही बराच ऊस गाळपाविना शिल्लक आहे.

आशा शिल्लक उसाला हेक्‍टरी 75 हजार रुपये अनुदान द्यावे तसेच  उसाच्या अतिरिक्त वाहतुकीसाठी सरकारने प्रतिष्ठान प्रति किलोमीटर पाच रुपये अनुदान द्यावे व ज्या शेतकऱ्यांचा ऊस जळीत करून गाळप केला आहे त्यासाठी हेक्‍टरी  पंचवीस हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना द्यावी, अशा आशयाची मागणी भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी केली.

यासंदर्भात भाजप किसान मोर्चाच्या वतीने साखर आयुक्तांच्या कार्यालयासमोर 5 मेला राज्य सरकारच्या विरोधात धरणेआंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व सहकार आयुक्त यांनी राज्यात ऊस गाळपविना शिल्लक असल्याचे आंदोलनस्थळी जाहीर केले होते.

त्यासोबतच राज्यात एकही टन उस गाळप शिवाय शिल्लक राहणार नाही असे देखील आश्वासन दिले होते. 5मे ते आजपर्यंत सरकारच्या आकडेवारीनुसार विचार केला तर रोज सरासरी दीड लाख टनाचे गाळप झाले असेल तर  या 18 दिवसात जवळपास सर्व उसाचे गाळप झाले असते.

परंतु यांचा खोटारडेपणा यानिमित्ताने उघड होताना दिसत आहे. आजही सरकारच्याच म्हणण्यानुसार राज्यात 17 लाख मेट्रिक टन ऊस शिल्लक आहे. याचा अर्थ असा होतो की हे सरकार राज्यातील ऊस उत्पादकांना उद्ध्वस्त करण्याचे काम करत असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे, असा आरोप काळे यांनी केला. 

त्यांनी जाहीर  प्रश्न केला आहे की सरकार आणखी किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या करायचे वाट पाहणार आहे असा देखील सवाल काळे यांनी केला आहे.

 महत्वाच्या बातम्या                                   

नक्की वाचा:दाखवून दिले! परिस्थितीवर स्वार होऊन ऊसतोड मजुरांची चार मुले बनली डॉक्टर

नक्की वाचा:भारताच्या 'या' निर्णयाने उडू शकते जागतिक बाजारपेठेत खळबड? वाचा सविस्तर

नक्की वाचा:शेतकरी मित्रांनो! घराचा किंवा खाणीचा कोळसा कार्बनचा स्रोत म्हणून शेतात वापरणे योग्य की अयोग्य, जाणून घेऊ

English Summary: demand to give twety five thousand subsidy per hector to farmer for extra cane crop Published on: 27 May 2022, 12:40 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters