1. बातम्या

भारताच्या 'या' निर्णयाने उडू शकते जागतिक बाजारपेठेत खळबड? वाचा सविस्तर

भारताने अलीगहू आणि साखर चा निर्यातीवर बंदी घातली. अलीकडेच गहू आणि साखर चा निर्यातीवर बंदी घातली. भारत आणि गहू निर्यात बंदी केल्यानंतर जि7 देशांनी नाराजी दाखवली होती.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
can indian goverment ban on  export to paddy grain due to some important reason behind desion

can indian goverment ban on export to paddy grain due to some important reason behind desion

भारताने अलीगहू आणि साखर चा निर्यातीवर बंदी घातली. अलीकडेच गहू आणि साखर चा निर्यातीवर बंदी घातली. भारत आणि गहू निर्यात बंदी केल्यानंतर जि7 देशांनी नाराजी दाखवली होती.

कारण सध्या अनेक देशांमध्ये दैनंदिन लागणाऱ्या खाद्य पदार्थांचा आवश्यक साठा नसल्याने अशा वस्तूंचे निर्यातीवर बंदी आणली जात आहे. कारण अशा प्रकारच्या अन्न संकट येण्याचे महत्त्वाचे कारण हे रशिया युक्रेन युद्धाला  देखील धरले जात आहे.

याच पार्श्वभूमीवर आता भारत सरकार गहू आणि साखर निर्यातीवर बंदी घातल्यानंतर तांदळाच्या निर्यातीवर देखील बंदी घालण्याची तयारी करत असल्याचे सांगितले जात आहे. पंतप्रधान कार्यालय हे घरगुती खाद्यपदार्थांच्या किमतींवर नियंत्रण यावे यासाठी हे पाऊल उचलत आहे.

याबाबत दिलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार पाच गरजेच्या दैनंदिन वस्तू निर्यात करण्यावर बंदी आणण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. यापैकी गहू आणि साखरेवर अधिच निर्यात बंदी आणली गेली आहे. येणाऱ्या काळामध्ये तांदूळ निर्यातीवर देखील बंदी आणण्याचा विचार सुरू आहे.

यामध्ये बासमती तांदूळ वगळता इतर तांदूळ निर्यात होणार नाहीत. महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी उच्च स्तरावर हालचाली सुरू असून याबाबतीत खाद्य वस्तूंच्या किमतींवर लक्ष ठेवणाऱ्या समितीने प्रत्येक उत्पादनाबाबत बैठक घेतली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर साखरे सोबत तांदूळनिर्यातबंदी या येऊ शकते असं सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे.

 भारतातील तांदूळ उत्पादनाचे स्थिती

 भारताचा तांदूळ उत्पादनाच्या बाबतीत विचार केला तर जगात अव्वल क्रमांकावर भारताचा क्रमांक लागतो. भारत जगातील तांदूळ निर्यातकरणाऱ्या देशांमध्ये दुसरा क्रमांक आहे.  सन 2021-22 मध्ये 150 हून अधिक देशांना तांदूळ निर्यात केला होता. भारत जो काही तांदूळ निर्यात करतो त्यामध्ये बासमती तांदूळ पेक्षा विना बासमती तांदूळ निर्यातीत मधून भारताला परदेशी चलन मोठ्या प्रमाणात मिळते.

इतर देशांप्रमाणेच अन्नधान्य निर्यातीच्या संदर्भात भारत देखील इनवॉर्ड पॉलिसी अमलात आणत आहे.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:शेतकरी बंधूंसाठी खूपच माहितीपूर्ण! बायोचर आहे जमिनीची सुपीकता अनेक दशके आणि शतके वाढवणारी यंत्रणा

नक्की वाचा:शेतकरी मित्रांनो! घराचा किंवा खाणीचा कोळसा कार्बनचा स्रोत म्हणून शेतात वापरणे योग्य की अयोग्य, जाणून घेऊ

नक्की वाचा:ग्रामीण भागाच्या विकासात HDFC बँकेची उडी;उघडेल ग्रामीण भागात 1000 पेक्षा जास्त शाखा

English Summary: can indian goverment ban on export to paddy grain due to some important reason behind desion Published on: 27 May 2022, 09:39 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters