नवी दिल्ली: 2019-20 मधे कांद्यासाठीच्या पेरणीला 3 ते 4 आठवड्यांचा विलंब तसेच पावसाचे आगमन उशीरा झाल्याने पेरणीक्षेत्रातही घट झाली. याशिवाय कांदा उत्पादक महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यात कापणीच्या हंगामापर्यंत लांबलेल्या पावसामुळे या भागातल्या कांदा पिकांचे नुकसान झाले. त्याचा विपरित परिणाम कांद्याच्या उत्पादनावर आणि खरीपाच्या पिकाच्या दर्जावर झाला. सप्टेंबर/ऑक्टोबर दरम्यान झालेल्या पावसाचा कांद्याच्या वाहतुकीवरही परिणाम झाला यामुळे बाजारपेठेत खरीपाच्या कांद्याची उपलब्धता मर्यादित राहिल्याने त्याचा परिणाम कांद्याच्या दरावर झाला.

यावर सरकारने रब्बी 2019 च्या हंगामात 57,373 मेट्रीक टन कांद्याच्या साठ्याची निर्मिती, 11 जून 2019 पासून कांदा निर्यातीला देण्यात येणारे प्रोत्साहन मागे घेणे, एमएमटीसीमार्फत कांदा आयातीला मंजुरी यासारख्या उपाययोजना हाती घेतल्या. केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
English Summary: Decrease onion productionPublished on: 14 December 2019, 08:27 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments