1. बातम्या

Agriculture News : कांदा बाजारात आवकेचा घटता कल, दर स्थिर

आता पुन्हा काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील कोणतीना कोणती बाजार समिती बंद राहत आहे. आज (दि.१३) रोजी उमराणा कांदा बाजार बंद होता. लासलगाव बाजार समितीत देखील कांद्याची आवक घटती आहे. तर दर मात्र स्थिर आहेत.

Onion Update News

Onion Update News

१) कांदा बाजारात आवकेचा घटता कल
केंद्र सरकारने कांदा निर्यातशुल्क लागू केल्यापासून कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांचे मात्र मोठं नुकसान झाले आहे. तर मागील काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे लिलाव १३ दिवस बंद होते. मात्र आता पुन्हा काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील कोणतीना कोणती बाजार समिती बंद राहत आहे. आज (दि.१३) रोजी उमराणा कांदा बाजार बंद होता. लासलगाव बाजार समितीत देखील कांद्याची आवक घटती आहे. तर दर मात्र स्थिर आहेत.

२) दराअभावी टोमॅटो रस्त्यावर, शेतकरी चिंतेत
नाशिक जिल्ह्यात कांद्यापाठोपाठ टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र टोमॅटोला दर नसल्याने उत्पादक शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. नाशिकमधील हिवरगाव येथिल टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याने टोमॅटो मेंढ्यापुढे फेकून दिला आहे. टोमॅटोला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्याने हा निर्णय घेतला आहे. तसंच टोमॅटो दराबाबत सरकारकडून ठोस उपाययोजना नसल्यामुळे शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे. तर याच टोमॅटोला मागील काही दिवसांपूर्वी १२० ते १५० रुपये दर मिळत होता.

३) सोयाबीन पिकावर शेतकऱ्याने फिरवला रोटावेटर
वर्ध्यातील एका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याने सोयाबीन पिकावर रोटावेटर फिरवला आहे. सोयाबीनवर पडलेल्या रोगामुळे पीक काढणी देखील परवडणारी नसल्याने शेतकऱ्याने हा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टी, येलो मोझँक आणि चारकोल बुरशीचा पिकावर प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. तसंच उत्पादनात देखील घट होणार आहे. यामुळे शेतकऱ्याने सोयाबीन काढणी ऐवजी पिकावर रोटावेटर फिरवण्याचा निर्णय घेतला आहे.

४) पपई पीक विमा योजना लागू
पपई पिकासाठी जळगाव, पुणे, उस्मानाबाद, धुळे, सोलापूर, बीड, औरंगाबाद, नंदुरबार , अहमदनगर,अमरावती, परभणी , जालना , लातूर , वाशिम या १४ जिल्ह्यात आणि तालुक्यातील अधिसूचित महसूल मंडळात पपई विमा लागू आहे. या जिल्ह्यात शासनामार्फत अधिसूचित महसूल मंडळ पातळीवर असलेल्या शासकीय हवामान केंद्र आकडेवारी वरून नुकसान भरपाई अंतिम केली जाते. या योजनेतंर्गत पपई पिकास निवडलेल्या विमा कंपनी मार्फत पिक नुकसानीस आर्थिक मदत दिली जाते.

५) मान्सून परतीच्या प्रवासात अडथळा
देशातून परतीच्या मान्सूनचा प्रवास सुरु आहे. राज्याच्या बऱ्याच भागातून देखील मान्सूनने माघार घेतली आहे. विदर्भ आणि कोकणाचा काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रातून मॉन्सून परतला आहे. मात्र मान्सूनच्या प्रवासात काहीसा अडथळा निर्माण झाला आहे. दोन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रासह देशाच्या आणखी काही भागांतून मॉन्सून परतण्याची शक्यता आहे. मान्सून परतल्यानंतर राज्यात कोरडे हवामान होऊन तापमान वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. राज्यात हळूहळू आता ऑक्टोबर हिटचा चटका वाढू लागला आहे.

English Summary: Declining trend of arrivals in onion market prices stable Published on: 13 October 2023, 03:13 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters