Wardha : सरकार सर्वसामान्यांचे जीवनमान सुरळीत व्हावे यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. अशीच एक योजना शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे. 'महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना'. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांचा कर्जाचा भार कमी केला जातो. या योजनेसाठी बँकांनी पोर्टलवर नावे अपलोड केली होती. योजनेस पात्र असलेल्या ५३ हजार २१२ शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना शेतीसाठी अनेक अडचणींचा डोंगर पार करावा लागत असतो. कधी दुष्काळ, कधी वादळी वारे, तर कधी अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अमाप नुकसान होत असते. त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा देण्यासाठी डिसेंबर २०१९ मध्ये महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा करण्यात आली.
या योजनेच्या अटी व शर्तीस पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील सर्व बँकांना सांगण्यात आले होते.
त्यानुसार बँकांनी अपलोड केलेल्या ५४ हजार ७९३ खातेदार शेतक-यांचे आधार प्रमाणिकरण करण्यासाठी पोर्टल उपलब्ध करण्यात आले होते. त्यापैकी ५३ हजार २१२ शेतक-यांना ज्यांनी आधार प्रमाणिकरण प्रक्रीया पूर्ण केली आहे त्यांना आता कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे.
सावधान ! देशात अजून कोरोना सक्रिय; एका दिवसात घावले तब्बल 'इतके' रुग्ण
कर्जमाफीची रक्कम ४७० कोटी रुपये इतकी आहे. ही रक्कम राज्य शासनाच्यावतीने शेतक-यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. सध्या १ हजार १२२ खात्यांचे आधार प्रमाणिकरण प्रक्रिया शिल्लक आहे. व त्यासाठी प्रमाणीकरणाची कारवाईदेखील सुरु आहे. शासनाने शेतक-यांना दिलासा देण्यासाठी या योजनेचा लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळावा.
IMD Monsoon News : पुढील चार दिवस महत्वाचे; या भागात होणार जोरदार पावसाचे आगमान
तसेच उर्वरित लाभार्थ्यांचे आधार प्रमाणिकरणाची मोहीम लवकरात लवकर पूर्ण करून शिल्लक लाभार्त्यांनासुद्धा या योजनेअंतर्गत समाविष्ट करुन घ्यावे. या योजनेचे शंभर टक्के काम होणे आवश्यक आहे,असे सबंधित विभागाच्या अधिका-यांना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी निर्देश दिले आहेत.
शासनाच्या वतीने राष्ट्रीयकृत, ग्रामीण व खाजगी बँकांकडून पीक कर्ज घेऊन मुदतीत परतफेड करणा-यांना कर्जावरील व्याजात सवलत दिली जाते.
जिल्हयात सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात २२ मार्चच्या अखेरपर्यंत घेतलेल्या कर्जाची मुदतीत परतफेड करणा-या ८ हजार शेतक-यांना १ कोटी ८५ लाख रुपयांची व्याज सवलत दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
7th pay commission: सरकारने कर्मचार्यांच्या DA मध्ये केली मोठी वाढ; थकबाकी ही मिळणार
Share your comments