कर्जमुक्ती योजना : पात्र उर्वरित शेतकऱ्यांना पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा

13 August 2020 03:33 PM By: भरत भास्कर जाधव


राज्यातील अनेक शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाला. परंतु या योजनेपासून साधरण २.७५ लाख शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले होते. परंतु आजपासून तेही कर्जमुक्त होतील. कारण राज्य सरकारने अतिरिक्त रुपयांचा निधी या योजनेस देण्यास मान्यता दिली आहे.  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी १ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी आकस्मिकता निधी अग्रिमातून उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. त्यामुळे २८ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिल्यानंतर शिल्लक उरलेल्या सुमारे पावणेतीन लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी आर्थिक तरतुदीचा मार्ग मोकळा झाला आहे.

महाविकास आघाडी सरकारने ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना’ २७ डिसेंबर २०१९ पासून सुरू केली. या योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंतचे शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. एकूण १८ हजार ५४२ कोटी रुपयांची ही कर्जमुक्ती योजना असून सात महिन्यांत २८ लाख शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करत १६ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. आता आणखी २ लाख ८२ हजार शेतकरी शिल्लक असून दोन हजार कोटी रुपयांची कर्जमुक्ती उरली आहे. आठवडाभरात त्याची तरतूद केली जाईल, असे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी जाहीर केले होते.

सध्या करोनामुळे बरेच उद्योग-व्यवसाय बंद असल्याने आर्थिक व्यवहार कमी होऊन कररूपात मिळणारा महसूल कमी झाला आहे. त्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने पैशांची तातडीने तरतूद करण्यासाठी आकस्मिकता निधीची मर्यादा वाढवणे आवश्यक होते. त्यानुसार आकस्मिकता निधीच्या १५० कोटी रुपये इतक्या कायम मर्यादेत १५०० कोटींची तात्पुरती वाढ करून ती १६५० कोटी रुपये करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. लवकरच कर्जमुक्ती योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व शिल्लक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकतील. 

दरम्यान प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतील राज्यामधील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थींना जुलै ते नोव्हेंबर २०२० या कालावधीकरिता अख्या चण्याऐवजी प्रति महिना प्रत्येक शिधापत्रिकाधारकास एक किलो मोफत चणाडाळ वितरित करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

Mahatma Jyotirao Phule Shetkari Karjamukti Yojana state governemnt thackeray government महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राज्य सरकार महाविकास आघाडी सरकार mahavikas aghadi
English Summary: Debt Relief Scheme: remaining eligible farmers get money

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.