राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत असते. यामुळे शेतकऱ्यांना आणि शेतकरी कुटूंबियांची फायदा होत असतो. असे असताना अनेक शेतकऱ्यांना याबाबत माहिती नसते. यामुळे अनेकजण या योजनांपासून वंचीत राहतात. आता यामध्ये स्व. गोपीनाथ मुंडे अपघात योजना ही एक आहे. शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसाला 2 लाखाची मदत ही राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाते.
यामुळे शेतकरी कुटूंबाला आर्थिक मदत केली जाते. घरचा कर्ता पुरुष गेल्यावर कुटुंबियांना सावरण्यासाठी या रकमेचा उपयोग होत आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये 16 शेतकरी कुटुंबियांना 32 लाखाची मदत देण्यात आली आहे. गेल्या 7 वर्षापासून ही योजना राबवली जात आहे. कृषी विभागाकडे अर्ज केल्यानंतर योजनेचा लाभ घेता येणार आहे. यामुळे अनेक घरांना आधार मिळणार आहे.
या योजनेमध्ये शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू किंवा अपघातामुळे डोळे अथवा दोन अवयव निकामी झाले असतील तर दोन लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाते. तसेच अपघातात एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाते. यामुळे ही योजना फायदेशीर ठरते.
कर्ता पुरुष गेल्यावर कुटुंबियांना सावरण्यासाठी या रकमेचा उपयोग होत आहे. अमरावतीमध्ये 16 शेतकरी कुटुंबियांना 32 लाखाची मदत देण्यात आली आहे. गेल्या 7 वर्षापासून ही योजना राबवली जात आहे. यासाठी कृषी विभागाकडे अर्ज करावा लागतो. विम्याचा लाभ हा 10 ते 75 वयोगटातील शेतकऱ्यालाच मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
आता जुन्नरचे नाव सातासमुद्रापार घुमणार! शिवनेरी हापूसबाबाबत हालचाली सुरु..
बातमी कामाची! देशी गाई संभाळा आणि लाखो कमवा, ३३ प्रकारची अन्नद्रव्ये होतात तयार, वाचा सविस्तर
आता गाव तिथे किसान मोर्चा, शेतकऱ्यांच्या समस्यांवर उठवणार आवाज...
Share your comments