1. बातम्या

नाबार्डच्या शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना, शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे आवाहन

शेतकऱ्यांसाठी त्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी तसेच शेतीला आधुनिकतेची जोड मिळण्यासाठी अनेक योजना राबवल्या जातात. असे असताना त्यांना अवजारे तसेच इतर साहित्य देण्यासाठी देखील अनेक योजना असतात. मात्र अनेकदा याबाबत शेतकऱ्यांना माहिती नसते. यामुळे शेतकरी यापासून वंचीत राहतात.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
farm trakters

farm trakters

शेतकऱ्यांसाठी त्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी तसेच शेतीला आधुनिकतेची जोड मिळण्यासाठी अनेक योजना राबवल्या जातात. असे असताना त्यांना अवजारे तसेच इतर साहित्य देण्यासाठी देखील अनेक योजना असतात. मात्र अनेकदा याबाबत शेतकऱ्यांना माहिती नसते. यामुळे शेतकरी यापासून वंचीत राहतात. आता शेती उद्योगांसंदर्भातील नवे प्रकल्प उभारण्यासाठी 'नाबार्ड'द्वारे कमी व्याज दराने कर्ज देण्यात येत आहे. यामुळे मात्र शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. याबाबत सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री व कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी माहिती दिली आहे.

याबाबत सेवा संस्थांद्वारे संदर्भातील येणाऱ्या कर्ज मागणीच्या प्रस्तावांना त्यांची छाननी करून नाबार्डकडे शिफारस देण्याचा निर्णय येथील जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने घेतला आहे. यामधून शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना वित्तीय व गैरवित्तीय या दोन्ही प्रकारच्या सेवा सुविधा मिळण्यासाठी प्राथमिक कर्जपुरवठा करणाऱ्या सेवा संस्था मजबूत व्यावसायिक संस्था निर्माण झाल्या पाहिजेत. ग्रामीण भागात शेती पूरक आधुनिक प्रकल्प उभारण्यासाठी अर्थपुरवठा करणे असे नाबार्डचे धोरण आहे. यामुळे शेतकरी आधुनिक शेतीकडे देखील वळतील, आणि शेतीचे उत्पन्न वाढण्यास यामुळे मदत होणार आहे.

यामुळे शेतकऱ्यांना सुलभ अर्थसाह्य मिळणार आहे. याबाबत माहिती अशी की, नाबार्डद्वारे सेवा सोसायट्यांच्या वतीने कृषी गोदाम, शीतगृह उभारणी, कृषी सेवा केंद्र, कृषी प्रक्रिया केंद्र, माती परीक्षण प्रयोगशाळा, शेतीमाल वाहतूक व विक्री व्यवस्था, ग्राहक भांडार, इतर कृषी उत्पादने त्याचबरोबर सेवा सोसायट्यांना अवजारे बँक उभारणीसाठी प्रस्ताव सादर करता येतील. यामुळे शेतकऱ्यांना अनेक गोष्टी उपलब्द होणार आहेत. तसेच आधुनिकता आणि यांत्रिकीकरण वाढणार आहे.

याबबाबत जिल्हा बँकेकडे प्राप्त झालेला प्रस्ताव छाननीनंतर राज्य बँकेकडे पाठवला जाईल आणि राज्य बँक शिफारशीसह तो नाबार्डकडे सादर करेल, असे या योजनेचे स्वरूप आहे. यामुळे याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा अनेक जिल्हा बँकेत देखील अनेक योजना असतात. यामुळे याचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली आहे. याबाबत काही अटी आणि नियमात बसल्यास आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल.

English Summary: Many welfare schemes for NABARD farmers, Minister Rajendra Patil-Yadravkar's appeal for farmers to benefit Published on: 13 January 2022, 10:56 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters