यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले आहे. पावसामुळे सर्वत्र पाणी साचल्याने शेतकऱ्यांची अधिक चिंता वाढली आहे. झालेल्या पावसामुळे सुमारे ७२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून न भरुन निघणारी ही हानी झाली आहे.
पावसामुळे सर्वाधिक जास्त नुकसान हे जिल्ह्यातील महागावा तालुक्यात झाले आहे. या भागात सुमारे ३७ हजार ७६० हेक्टरवर क्षेत्र बाधित झाले आहे. महागावच्या लेवा या गावाला पैनगंगा नदीच्या पुराचा वेढा बसला आहे. ऊस, हळद, कापूस, सोयाबीन या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. .
यवतमाळ जिल्ह्यातील पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याचे आदेश मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी प्रशासनला दिले आहेत. तसेच पूरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना तात्काळ धान्य वितरण तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे निर्देश अनिल पाटील यांनी दिले आहेत.
पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी
दिग्रस परिसरात झालेल्या अतिवष्टीमुळे दिग्रस शहरातून जाणाऱ्या धावंडा नदीला पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होऊन शहरात सर्वत्र पाणी शिरले. यामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानीची पालकमंत्री संजय राठोड यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त भागातील पंचनामे तातडीने करून नागरिकांना मदत करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
Share your comments