ग्राहकांना आर्थिक फटका ; दहाव्या दिवशीही इंधनाच्या किंमतीत वाढ

16 June 2020 01:22 PM By: भरत भास्कर जाधव


पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचे सत्र आजही कायम आहे.  कोरोना व्हायरसमुले जगातील अर्थव्यवस्था कोलमडल्याने  मागील महिन्यात कच्चा तेलाच्या किंमतींमध्ये घसरण पाहण्यास मिळाली होती. दरम्यान ओपेक (OPEC-Organization of the Petroleum Exporting Countries) देशांनी  ( कच्चा तेलाचे उत्पादन करणाऱ्या देशांची संघटना ) क्रुड ऑईलचे उत्पादन घटल्यानंतर किंमतींमध्ये वाढ केली आहे. ब्रेंट क्रुडचे दर वाढून ३९ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे. तर भारतातील पेट्रोलच्या किंमतींमध्येही वाढ झाली आहे. दरम्यान विशेषज्ञांच्या मतानुसार, अंतरराष्ट्रीय पातळीवर पेट्रोल अजूनही एक लिटर पॅकेज पाण्याच्या बाटलीच्या किंमतीपेक्षा स्वस्त आहे.

सलग दहाव्या दिवशी इंधन कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली. आज (मंगळवार) पेट्रोलच्या दरात दिल्लीत ४७ पैशांची तर डिझेलच्या दरात ५७ पैशांती वाढ करण्यात आली. यानंतर दिल्लीत पेट्रोलचे दर ७६.७३ रूपये प्रति लीटर आणि डिझेलचे दर ७५.१९ रूपये प्रति लीटर इतके झाले आहेत. गेल्या दहा दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तीन रूपयांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. ही दर वाढ २१ महिन्यामधील सर्वाधिक दर वाढ आहे. 

यापूर्वी सोमवारी सलग नवव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. सोमवारी पेट्रोलच्या दरात ४८ पैसे तर डिझेलच्या दरात ५९ पैशांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा पेट्रोल डिझेलची दरवाढ करण्यात आली. दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर ८३.६२ रूपये प्रति लीटर, तर डिझेलचे दर ७३.७५ रूपये, चेन्नईत पेट्रोलचे दर ८०.३७ रूपये प्रति लीटर, तर डिझेलचे दर७३.१७ रूपये प्रति लीटर आणि कोलकात्यात पेट्रोलचे दर ७८.५५ रूपये प्रति लीटर, तर डिझेलचे दर ७०.८४ रूपये प्रति लिटर झाले आहेत.

दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल करण्यात येतो. तसंच सकाळी सहा वाजल्यापासूनच हे नवे दर लागूही करण्यात येतात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक्साइज ड्युटी, डिलर कमीशन आणि अन्य बाबींचा समावेश केल्यानंतर याचे दर जवळपास दुप्पट होतात.मार्च महिन्यात सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या एकसाइज ड्युटीमध्ये ३ रुपये प्रति लिटर मागे वाढवले होते. यानंतर तेल कंपन्यांनी किंमतीमधील टॅक्स वाढवला नाही. यामुळे कंपन्या आता पेट्रोलवर दररोज दर वाढवत आहेत. 

OPEC Organization of the Petroleum Exporting Countries कच्चा तेलाचे उत्पादन करणाऱ्या देशांची संघटना ओपेक इंधनाच्या किंमतीत वाढ fuel price rise fuel price पेट्रोल डिझेल Diesel petrol
English Summary: customer's budget will collapsed; fuel price rise on tenth day

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.