1. बातम्या

मार्केट डिमांड नुसार देशी वांग्याची शेती मिळवा बक्कळ फायदा

किरण भेकणे
किरण भेकणे
brinjal

brinjal

आजकाल प्रत्येक शेतकरी शेती मधून बक्कळ नफा मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांची  पालेभाज्यांची  आणि  नगदी  पिकांची लागवड करत  आहे.जास्त करून शेतकरी वर्ग हा सिझेनेबल पिके घेत असतो त्यामुळं बऱ्याच वेळा त्याला त्यातून जास्त नफा मिळत नसे. या रोगराई आणि हायब्रीड च्या जीवनात लोक देशी पदार्थ, धान्य, आणि पालेभाज्यांना प्रथम पसंती देत आहेत. आणि त्यात सर्व देशी असेल तर लोक पाहिजे तेवढी किंमत द्यायला तयार आहेत.

माळरान हिरवीगार दिसू लागली:

हायब्रिड वांग्यापेक्षा देशी वांग्याला अधिक चव असते. त्यामुळं लोक देशी वांग्याला खरेदी साठी पसंती देत असतात.सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुका हा  नेहमी  दुष्काळी  तालुका  आहे. त्यामुळं तिथं ज्वारी बाजरी या पिकांशिवाय दुसरी पिके शेतकरी वर्ग अजिबात घेत नसत.या तालुक्यातील बऱ्याच गावात पाणीटंचाई सुद्धा बघायला मिळते. परंतु गेल्या काही दिवसांपासून टेंभू उपसा सिंचन योजनेचं पाणी आलं आणि येथील परिस्थिती बदलू लागली. त्यामुळे सगळी माळरान हिरवीगार दिसू लागली. आणि डाळिंबासोबत रसाळ द्राक्ष पिकू लागली.

सांगली जिल्ह्यातील सुखदेव धोंडीराम भोसले हा शेतकरी गेल्या 7 ते 8 वर्षांपासून देशी वांग्याची शेती करत आहेत. घरी तयार केलेली बियाणे वापरून त्याची लागवड ते एप्रिल  व  ऑक्टोबर अशा दोन महिन्यांदरम्यान करतात.देशी वांग्याची लागवड आणि हंगामांची निवड करून त्यातून त्यांनी आपले अर्थकारण अधिक मजबूत केले आहे.आटपाडी तालुक्यातील  सुखदेव  सांगतात की सुरवातीस त्यांचे वडील वांग्याची शेती करायचे. त्यांना पहिल्यापासूनच तरकारी पिकविण्याचा नाद होता. कधी ते कोंथिबीर, कधी कांदा अशी पिके घेत असे. पण त्यातला पुरेसा  अभ्यास नव्हता.सुखदेव यांना वांग्याची शेती करण्याआधी गावातील मित्र विलास देशमुख यांचे वांग्यासाठी मार्गदर्शन मिळाले. पुतण्यांचाही चांगला अभ्यास झाला. मग लागवडीपासून ते  काढणीपर्यंतचे तंत्र आत्मसात होऊ  लागले. आणि त्यातून ते बक्कळ पैसे कमवू लागले.

देशी वांग्याची निवड का?

बाजारात देशी वांग्याच्या चवीमुळे बाजारात त्याला मोठी मागणी असते. म्हणूनच त्यांनी देशी वांग्याची लागवडी साठी निवड केली. त्याचबरोबर त्यांनी कधीच त्याचे बियाणे विकत आणले नाही ते घरातील च बियाणांचा वापर करून रोपे तयार करत असे.

बाजारपेठ:-

सुखदेव म्हणतात की देशी वांग्याला मागणी जास्त असल्याने विक्री साठी जास्त त्रास होत नाही ते या देशी वांग्याची विक्री आटपाडी तालुक्यातील काही आठवडे बाजारात फक्त करतात असे त्यांनी सांगितले आहे.या देशी वांग्याचा रंग हा निळसर असतो. ग्राहकांसाठी देशी वांग्यला प्रति किलो ४० ते ४५ रुपये दर असतो. मात्र आम्ही थेट विक्री न करता व्यापाऱ्यांना माल देतो. वांग्याची विक्री निलावीत सुद्धा होते.

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters