गेल्या काही दिवसांपासून मान्सून (monsoon) महाराष्ट्रात (Maharashtra) जोरदार बरसताना दिसत आहे. काही ठिकाणी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतीच्या कामाला वेग आला आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तसेच अजूनही असाच पाऊस सुरु राहिला तर पाण्याखाली गेलेली पिके सडण्याचा धोका (Risk of crop rot) असल्याची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सततच्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामात उत्पादन कसे होणार, याची चिंता शेतकऱ्यांना (Farmers) सतावत आहे. भंडारा जिल्हा धान पिक उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील बहुतांश भागात भातशेती केली जाते. यंदा पेरणीला उशीर होत असला तरी शेतकऱ्यांचे लक्ष भातशेतीकडे आहे. याशिवाय जिल्ह्यात भाज्यांनाही वेगळे महत्त्व आहे.
येथील वांग्याची मागणी जिल्ह्याबाहेर अधिक आहे. मात्र यंदा पिके व भाजीपाला पाण्यात (Crops under water) बुडाला आहे. अतिवृष्टीमुळे शेतात पाणी भरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यात आता पाऊस कमी झाला असला तरी शेतात साचलेले पाणी कमी झालेले नाही. त्यामुळे वांग्याची रोपे जागेवरच सडत आहेत. दुसरीकडे धानाची पेरणी वेळेवर न झाल्याने उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
PM kisan: पीएम किसान लाभार्थ्यांना अलर्ट! यामुळे खात्यात जमा होणार नाही १२वा हफ्ता
उत्पादनाबरोबरच शेतीमालाला बाजारपेठही हवी. भंडारा जिल्ह्यातील वांग्याला नागपूर, गोंदिया आणि मध्य प्रदेशातूनही मागणी आहे. जवळच्या बाजारपेठेचा फायदा शेतकऱ्यांना होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी इतर बाजारातही विक्री करण्याचे धाडस केले. मात्र, अतिवृष्टीमुळे मुख्य पिकांना फटका बसला आहे. काळाच्या ओघात आवश्यक ते बदल करून उत्पादन आणि उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत, मात्र निसर्गाची साथ मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
विदर्भात भात आणि कपाशीची सर्वाधिक लागवड केली जाते, मात्र यंदा काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणीही केली आहे. यंदा खरिपात आमचा मोठा फटका बसल्याचे शेतकरी सांगतात. काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांवर तिसऱ्यांदा पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.
शेतकरी करत आहेत नुकसान भरपाईची मागणी
यावर्षी शेती व्यवसायात केवळ तोटाच झाल्याचे शेतकरी सांगतात. हंगामाच्या सुरुवातीला अतिवृष्टी झालेल्या पिकांचे नुकसान झाले आहे, त्यामुळे आता तिसरी पेरणी किंवा भाजीपाल्याची दुबार पेरणी करणे शक्य होणार नाही. याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी व मशागतीवर लाखोंचा खर्च केला आहे. खरीप पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे, मात्र अद्याप पंचनामे सुरू झालेले नाहीत.
महत्वाच्या बातम्या:
Organic Fertilizer: शेतकऱ्यांचे जीवन बदलणार! शेतात टाका हे खत १८ दिवसांत होईल फायदाच फायदा
बळीराजाची लगबग वाढली! पाऊस थांबताच शेतात खतासह कीटकनाशकांची फवारणी सुरु
Share your comments