Crop Loss: राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी (Farmers) अडचणीत सापडला आहे. ढगफुटीसदृश्य पावसाने राज्यातील खरीप पिकांचे (Kharip Crop) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असल्याने हातातोंडाला आलेली पिके वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.
खरीप पिकांच्या काढणीवेळी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. सोयाबीन (Soyabean) पिकाच्या काढणीवेळी आलेल्या पावसाने सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनच्या शेंगा पावसात भिजल्याने त्याला कोंब फुटू लागले आहेत.
नांदेड (Nanded) जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. तरीही अद्याप कोणतीही मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. हदगाव तालुक्यातील मनाठा, भाटेगाव परिसरात जोरदार अतिवृष्टी झाली आहे. या परतीच्या धुव्वाधार पावसामुळं सोयाबीनसह,उडीद, मूग ही पिकं पाण्याखाली गेली आहेत.
पुढील ३ दिवस पावसाचे! महाराष्ट्रासह अनेक राज्यांना बसणार मुसळधार पावसाचा तडाखा; अलर्ट जारी
ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. गेल्या आठ दिवसांपासून नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. काढणीला आलेली पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
संततधार पावसामुळे उरलेल्या पिकांची काढणी शेतकऱ्यांना करता येत नाही. तसेच ही पिकेही पावसाने खराब होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे. तसेच सरकारडून अजूनही काही मदत मिळत नसल्याने दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
वर्धा (Vardha) जिल्ह्यालाही मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे सोयाबीन आणि कापूस पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. तसेच शेतीमध्ये पाणी साठून राहिल्याने आणखी मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
सोने 5445 रुपयांनी स्वस्त तर चांदी 22876 रुपयांनी स्वस्त; फटाफट चेक करा नवीनतम दर...
वर्धा जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि सतत पाऊस पडत असल्याने इतर पिकांवरही रोग पडण्याची शक्यता आहे. मुसळधार पाऊस आणि बाजारात सोयाबीनला मिळत नसलेल्या भावामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे.
आजही पावसाचा यलो अलर्ट
राज्यात आजही पावसाचा अंदाज दिला आहे. कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. आधीच पावसानं शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज दिल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
कार खरेदी करायचीय तर गोंधळून जाऊ नका; अशी निवडा सीएनजी किंवा पेट्रोल कार
धक्कादायक! महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येचा आलेख वाढला; २ महिन्यात तब्बल २६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
Share your comments