1. ऑटोमोबाईल

Car Comparison: कार खरेदी करायचीय तर गोंधळून जाऊ नका; अशी निवडा सीएनजी किंवा पेट्रोल कार

Car Comparison: देशात सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहेत. दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीच्या शुभमूर्तावर अनेकजण कार खरेदी करण्याचा विचार करत असतात. मात्र काही वेळा कार खरेदी करण्याच्यावेळी अनेकांना पेट्रोल-डिझेल की सीएनजी कार खरेदी करायची हा प्रश्न पडतो.

ऋषिकेश महादेव वाघ
ऋषिकेश महादेव वाघ
CNG-Petrol Car

CNG-Petrol Car

Car Comparison: देशात सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहेत. दिवाळी (Diwali) काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीच्या शुभमूर्तावर अनेकजण कार खरेदी करण्याचा विचार करत असतात. मात्र काही वेळा कार खरेदी करण्याच्यावेळी अनेकांना पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel) की सीएनजी कार (CNG) खरेदी करायची हा प्रश्न पडतो.

जेव्हा आपण कार खरेदी करण्याचा विचार करतो तेव्हा गोंधळ होणे सामान्य आहे. वरून सगळ्या गाड्यांच्या कंपन्यांची डझनभर मॉडेल्स, काही पेट्रोल किंवा काही डिझेल, काही सीएनजी की काही इलेक्ट्रिक, इतकं की तुलना करताना डोकं चक्रावतं. म्हणूनच तुम्हाला सोपा मार्ग सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही स्वतःसाठी चांगली कार निवडू शकाल.

मायलेज/किफायतशीर

जर आपण CNG कारबद्दल बोललो, तर ती पेट्रोलच्या (Petrol Car) तुलनेत किफायतशीर तर आहेच पण जास्त मायलेजही देते. तर पेट्रोल कारमध्ये तुम्हाला पिकअप जास्त मिळते. तसेच, सीएनजी कारपेक्षाही स्वस्त आहे. पण जर तुम्ही नियमितपणे कार वापरणार असाल तर सीएनजीचा पर्याय उत्तम राहील.

कर्मचाऱ्यांची लॉटरी! DA वाढीनंतर केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना दिली आणखी एक मोठी भेट

पेट्रोल कारचे फायदे

1.सीएनजी कारच्या तुलनेत पेट्रोल कारच्या किमतीत सुमारे 50-60000 रुपयांचा फरक आहे.
2.पेट्रोल कारमध्ये तुम्हाला पिकअप सीएनजी कारपेक्षा ती चांगली मिळेल. पेट्रोल कारने तुम्ही डोंगराळ भागातही चिंता न करता जाऊ शकता.
3.पेट्रोल कारचे आयुष्य सीएनजी कारपेक्षा जास्त असते. यामुळे तुम्ही तुमची कार कधी विकली तर तुम्हाला सीएनजी कारपेक्षा चांगले पैसे मिळतील.
4.तुमच्या कारचा वापर मर्यादित असेल, तर पेट्रोल कारची निवड करा.

पुढील ३ दिवस पावसाचे! महाराष्ट्रासह अनेक राज्यांना बसणार मुसळधार पावसाचा तडाखा; अलर्ट जारी

CNG कारचे फायदे

1.तुमची बहुतेक धावपळ शहर, गावात अशा ठिकाणी असेल जिथे CNG सहज उपलब्ध असेल, तर तुम्ही CNG निवडू शकता. या ठिकाणी पिकअपची विशेष गरज नाही.
2.तुमची धावपळ जास्त असेल तर तुम्ही कुठेतरी येत-जाता. त्यामुळे सीएनजी कार तुमच्या खिशाची खूप काळजी घेईल.
3.तुम्हालाही कारचा छंद हवा असेल आणि पेट्रोलची महागाई टाळायची असेल, तर सीएनजी कार तुमची इच्छा पूर्ण करू शकते.

महत्वाच्या बातम्या:
धक्कादायक! महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येचा आलेख वाढला; २ महिन्यात तब्बल २६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
सोने 5445 रुपयांनी स्वस्त तर चांदी 22876 रुपयांनी स्वस्त; फटाफट चेक करा नवीनतम दर...

English Summary: Car Comparison: Don't get confused if you want to buy a car; Choose a CNG or Petrol car Published on: 13 October 2022, 01:16 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश महादेव वाघ. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters