परभणी जिल्ह्यात पीककर्ज वाटप २४.०६ टक्के

20 January 2021 07:18 PM By: भरत भास्कर जाधव

परभणी जिल्र्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात पीक कर्जाचे वाटप संथगतीने सुरू आहे. सोमवारपर्यंत जिल्ह्यातील बँकांनी २० हजार ३९७ शेतकऱ्यांना १०८ कोटी ७२ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. जिल्हा बँकेने कर्ज वाटपात आघाडी घेतली आहे. राष्ट्रीयीकृत बँकांना अजूनही हात मोकळा सोडला नाही.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेने हात आखडता घेतल्याचे चित्र आहे. बँकांना यंदाच्या हंगामात ४५१ कोटी ५७ लाख रुपये एवढे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे.त्यात राष्ट्रीयीकृत बँकांना २५८ कोटी ३४ लाख रुपये, खासगी बँकांना ३४ कोटी ८३ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेला ४७ कोटी ४८ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १११ कोटी २२ लाख रुपये उद्दिष्ट आहे. जिल्ह्यातील ११ राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांना सर्वाधिक पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असले तरी त्यांची पीककर्ज वाटपाची गती अतिशय संथ असून आजवर ३ हजार ८०५ शेतकऱ्यांना २७ कोटी ७७ लाख रुपये कर्जवाटप केले.

त्यात भारतीय स्टेट बँकेने १ हजार ५१० शेतकऱ्यांना ११ कोटी ३२ लाख रुपये,बँक ऑफ बडोदाने ४ लाख रुपये,बँक ऑफ इंडियाने १५९ शेतकऱ्यांना १ कोटी २३ लाख रुपये, बँक ऑफ महाराष्ट्राने ४१० शेतकऱ्यांना २ कोटी ५० लाख रुपये, कॅनरा बँकेने ७८८ शेतकऱ्यांना ४ कोटी ८४ लाख रुपये, युनियन बँकेने ३९४ शेतकऱ्यांना ३ कोटी २४ लाख रुपये पीक कर्ज वाटप केले आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने ४ शेतकऱ्यांना ३ लाख रुपये . पंजाब नॅशनल बँकेने ५०शेतकऱ्यांना ४०लाख रुपये, इंडियन ओव्हरसीज बँकेने १७५ शेतकऱ्यांना ९ कोटी ६३ लाख रुपये युको बँकेने ३११ शेतकऱ्यांना २ कोटी ५२ लाख रुपये कर्ज वाटप केले. इंडियन बँकेने सोमवापर्यंत कर्जवाटप केले नव्हते.

 

चार खासगी बँकांपैकी एचडीएफसी बँकेने एक शेतकऱ्यास ७ लाख रुपये आणि आयसीआयसीआय बँकेने ३७२ शेतकऱ्यांना ५ कोटी ८१ लाख रुपये, आयडीबीआयने ४८६ शेतकऱ्यांना १ कोटी २६ लाख रुपये कर्जवाटप केले.

crop loan Parbhani परभणी पीक कर्ज
English Summary: Crop loan disbursement in Parbhani district is 24.06 percent

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.