चिखली-
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांच्यासह शेतकरी यांनी पिक विमा प्रश्नाच्या अनुषंघाने शेतकर्याना उद्भवणार्या समस्यांचा पाढा चिखली तालुका कृषी अधिकारी श्री शिंदे यांच्याकडे मांडत पिक विमा समस्यांचा निपटारा करावा असी मागणी केली होती.दरम्याण तालूका तक्रार निवारण समितीकडुन दि११जानेवारी रोजी पिक विमा प्रश्नावर समिती ची सभा आयोजीत करण्यात आली होती.तर यामधे पिक विमा संदर्भातील सर्व मुद्यांवर सविस्तर चर्चा करीत याबब कार्यवाही च्या सुचना देत ठराव घेण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.
सततधार पावसामुळे व अतिवृष्टिमुळे शेतकर्याचे मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाल्याने व नदिकाठच्या जमीनी पिकासह खरडुन गेल्याने नुकसान भरपाई व पिक विमा देण्यात यावा,अशी ओरड शेतकर्याकडुन होत असल्याने
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांनी शेतकर्याच्या विविध मागण्यांसाठी अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन केले होते.यामधे पिक विमा प्रश्न देखील प्राधान्यक्रमे घेण्यात आला होता.शेतकरी प्रश्नावर याबाबत मंत्रालयात बैठक सुद्धा बोलवण्यात आली होती.तर वेळोवेळी पाठपुरावा व स्वाभिमानी ने घेतलेल्या आंदोलनात्मक भुमिकेमुळे जिल्ह्यासाठी पिक विमा देखील मंजुर करण्यात आला होता.तालुक्यातील हजारो शेतकर्याच्या खात्यावर पिक विमा रक्कम सुद्धा जमा झाली परंतु पिक विमा कंपनीकडुन काहिंना तोकडी रक्कम देणे,खाते क्र चुकवणे,वेळोवेळी चुकीची व दिशाभुल करणारी माहिती कृषी विभागास कंपनीकडुन पुरवण्यात येणे,उडीद,तुर,मुंग,सोयाबीन पिकाचा विमा काढला असतांना तुरीचाच विमा मंजुर करणे,नुकसान पाहता पिक विमा रक्कम कमी मिळणे,कृषी विभागाने दिलेल्या यादीत पैसे पेड परंतु प्रत्यक्ष मात्र खात्यावर पैसे आले नसल्याच्या व इतर विविध तक्रारी प्राप्त होत असल्याने
दि०५जानेवारी रोजी असंख्य शेतकर्यासह तालुका कृषी अधिकारी यांना घेराव घालत पिक विमा संदर्भातील तक्रारी अनुषंघाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी शेतकर्यासह जाब विचारला होता.तर शेतकर्याच्या स्वातंत्र तक्रारी कृषी कार्यालयाकडे सादर करण्यात आल्या होत्या तर विमा कंपनीवर गुन्हे दाखल करुण पिक विमा रक्कम देण्याची मागणी जिल्हाधिकारी,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,तहसिलदार,ठाणेदार,यांच्याकडे सुद्धा करण्यात आली होती.तर असंख्य तक्रारी प्राप्त होवुनही तालूका व जिल्हा तक्रार निवारण समिती करती तरी काय?असा सवाल पत्रामधे शेतकर्यासह स्वाभिमानी कडुन उपस्थीत करण्यात आला होता.दरम्याण दि ११जानेवारी रोजी चिखली तहसिल कार्यालयामध्ये पिक विमा प्रश्नावर उद्भवाणार्या वरील व इतर समस्यांच्या अनुषंघाने तालुका तक्रार निवारण समितीचे बैठक संपन्न झाली आहे.तर तक्रारीचा निपटारा करणे संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली असल्याने व शेतकरी प्रतिनीधी यांनी विमा कंपनी प्रतिनीधी यांनी काय चुका केल्यात
त्या समितीकडे पुराव्यानीशी स्पष्ट करण्यात आल्याने याबाबत तातडीने कार्यवाही होवुन पिक विमा तक्रारींचे निवारण करणे बाबतच्या सुचना समितीचे अध्यक्ष तथा तहसिलदार श्री अजितकुमार येळे यांनी दिल्या आहेत.या बैठकीस डॉ श्री अजितकुमार येळे,गट विकास अधिकारी श्री हिवाळे,नायब तहसिलदार विर,प्र तालुका कृषी अधिकारी श्री येवले,पंचायत समिती तालुका कृषी अधिकारी श्री संदिप सोनुने,शेतकरी प्रतिनिधी विनायक सरनाईक,विजय भुतेकर,प्रल्हाद देव्हडे,दामोधर बाहेकर,प्रकाश घुबे,गणेश थुट्टे,फिरोज खान,बालासाहेब देशमुख यांच्यासह कंपनी प्रतिनिधी,संबंधीत विभागाचे अधिकारी व तक्रारदार शेतकरी उपस्थीत होते
Share your comments