Wheat Exports: भारताने गव्हाच्या निर्यातीवर बंदी आणल्यामुळे जगभरातून भारतावर गहू निर्यात बंदी हटवण्यासाठी दबाव आणला जात आहे. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे भारतासह अनेक देशांच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचे बरेच नुकसान झाले आहे. चार महिने उलटूनदेखील युद्धबंदीची अधिकृत घोषणा अद्यापही झालेली नाही. या युद्धामुळे भारतासह अनेक देशांना झळ बसत असून सध्या जगभरात गव्हाच्या टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामुळे जगभरात गव्हाची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत आहे. जिथून गहू मिळेल तिथून खरेदी करण्यावर भर दिला जात आहे. भारतात महागाई वाढली असून अन्नधान्यांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे गव्हाच्या किंमती नियंत्रणात रहाव्यात यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. इतर देशांत गव्हाची टंचाई निर्माण झाल्यामुळे मोदी सरकारच्या या निर्णयावर जगभरातून टीका होत आहे.
शिवाय निर्यातबंदी उठवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी देखील केली जात आहे. अशातच आता दक्षिण कोरियाने या निर्णयाचं स्वागत करून मोदी सरकारने नागरिकांच्या हितासाठीच हा निर्णय घेतला असणार असे गौरवोद्गार काढले आहेत. आता दक्षिण कोरियानेदेखील भारताच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे.
निर्यात बंदी हटवण्याबाबत जगभरातून होतीय मागणी:
केंद्र सरकारने 13 मे रोजी गहू निर्यात बंदीची घोषणा केली होती. देशात महागाई वाढली असून गहूची निर्यात अधिक झाली तर देशात त्याचा साठा कमी होऊन किंमतीत वाढ होईल यामुळे गहू निर्यात बंदी करण्यात आली. मात्र या निर्णयाला जगभरातून टीका करण्यात आली. शिवाय आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिवा यांनी भारताने लादलेली गहू निर्यात बंदी लवकरात लवकर उठवावी, अशी विनंती केली आहे.
दक्षिण कोरियाचे समर्थन:
भारतातील दक्षिण कोरियाचे राजदूत चेंग-जे-बोक यांनी एका कार्यक्रमात या निर्णयाबाबत बोलताना म्हणाले, 2030 सालापर्यंत भारत आणि दक्षिण कोरिया हे दोन्ही आशियायी देश 5000 कोटी डॉलर अर्थव्यवस्थेचं आपलं स्वप्न पूर्ण करतील. तसेच गहू निर्यात बंदीचा दक्षिण कोरियावर काय परिणाम होईल असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला तेव्हा, निर्यातबंदी लादणे हा त्यांचा अंतर्गत धोरणाचा प्रश्न असून देशांतर्गत परिस्थितीचा विचार करूनच सरकारने हा निर्णय घेतला असणार असं मत व्यक्त केलं.
चंद्रपुरात अख्खं मार्केट आपलय..! शेतकऱ्यांची मॉलमधून शेतीमालाची विक्री, शेतकरीच झाले व्यापारी
भारत व्यापार आणि अर्थव्यवस्थेच्या बाबतीत विश्वगुरू
भारत देश हा केवळ राजकीय मुत्सद्देगिरीबाबतीत नव्हे तर व्यापार आणि अर्थव्यवस्थेच्या बाबतीतही विश्वगुरू आणि जागतिक सत्ता असणारा देश आहे असल्याचं दक्षिण कोरियानं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील दरांवर भारताने घेतलेल्या निर्णयांचा परिणाम होतो याकडे त्यांनी लक्ष वेधलं. तसेच गहू, साखर आणि इतर साहित्याच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराकडे आपलं बारीक लक्ष असल्याचंही चेंग-जे-बोक यांनी सांगितलं आहे.
भारत आणि दक्षिण कोरिया सरकार
पाच दिवसांच्या कोरियन व्यापार मेळाव्याचं उद्घाटन भारतातील दक्षिण कोरियाचे राजदूत चेंग-जे-बोक यांनी केलं. त्यावेळी दक्षिण कोरियातील नवं सरकार व
भारतातील मोदी सरकार हे परस्पर सहकार्यानं व्यापारवृद्धी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या:
खत विक्रीबाबत मोदी सरकारचा दिलासादायक निर्णय; शेतकऱ्यांचा होणार फायदा
शेतकरी संकटात; तब्ब्ल २ हजार कोंबड्यांचा मृत्यू
Share your comments