कोरोनामुळे साखरेच्या मागणीतील गोडवा झाला कमी

24 March 2020 12:22 PM


कोरोना व्हायरसमुळे अनेक उद्योग प्रभावित झाले असून  व्यावसायिकांसह शेती उद्योगावरही संकट उभे राहिले आहे. दरम्यान साखर उद्योगावरही कोरोनाचा प्रभाव जाणवत आहे. साखरेच्या मागणीत घट झाल्याची माहिती इकोनॉमिक्स टाईम्स या वृत्तसंस्थेने दिली आहे.   या व्हायरसमुळे साखरेच्या मागणी अजून घट होऊ शकते,  असा अंदाजही वर्तवण्यात येत आहे.   इंडोनेशियातून साखरेची मागणी होत असते. परंतु कोरोनामुळे तेथील मागणीत घट झाली आहे. मागील पंधरा दिवसात जागतिक बाजारपेठेत साखरेचे दर २२ टक्क्यांनी कमी झाले आहेत.   याविषयीची माहिती सहकारी साखर कारखान्याचे राष्ट्रीय व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनावरे यांनी एका माध्यमाला दिली आहे.  दरम्यान थायलँडमधील  साखरेच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. साधरण ५० टक्के उत्पादन घटेल अशी शक्यता असून भारताला याचा  फायदा होईल,  अशी आशा व्यक्त केली  जात आहे.

का होत आहे मागणीत घट
कोरोना व्हायरसमुळे सर्व जग भयभीत झाले असून उद्योग धंद्यांवर मोठे संकट आले आहे.  कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य आजार आहे. यामुळे राज्यासह देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.  परदेशात लॉकडाऊन करण्यात आले आहे.   तर राज्यात कलम १४४ लागू असून ५ जणांपेक्षा अधिक लोक जमा झाल्यास कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

कार्यक्रम आणि लग्न समारंभ रद्द - लोकांनी गर्दी करु नये, असा आदेश सरकारकडून देण्यात आहे. यामुळे सामाजिक कार्यक्रम आणि लग्न समारंभ नागरिकांनी रद्द केले आहेत. या कार्यक्रमात साखरेची मागणी नेहमी असते. परंतु सर्व कार्यक्रम रद्द झाल्यामुळे मागणी कमी झाली आहे.
आईसक्रिम कोल्ड ड्रिंक्सची मागणी कमी - कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी थंड पदार्थांचे सेवन करू नका, असे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी  वारंवार सांगितले आहे.  प्रतिबंध म्हणून नागरिकांनी  कोल्ड ड्रिंक्स आणि आईसक्रिमकडे पाठ फिरवली आहे.


sugar factories corona virus Export prakash naiknavare साखर साखर उद्योग प्रकाश नाईकनावरे कोरोना व्हायरस
English Summary: covid-19 : sugar export fall due to corona virus

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.