काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत पार पडली होती. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यामध्ये कोटीच्या वर बक्षिसांची रक्कम दिली गेली. तसेच अनेक वाहने देखील बक्षीस म्हणून दिली गेली. पिंपरी चिंचवडचे आमदार महेश लांडगे यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती.
असे असताना आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सध्या श्रावण सुरु होण्यास अवघे तीन दिवस राहिल्याने आखाड पार्ट्या सध्या रंगात आल्या आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) तर उद्या शहरातीलच नव्हे, तर राज्यातीलही सर्वात मोठी अशी आखाड पार्टी होणार आहे. यामुळे पुन्हा एकदा याची चर्चा सुरू झाली आहे.
एका दिवशी एका वेळी दहा ठिकाणी दिलेली ही सर्वात मोठी मेगा आषाढ मेजवानी असणार आहे. यामध्ये सुमारे ७० हजार जणांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी याचे आयोजन केले आहे. उद्या रात्री ही पार्टी होणार आहे. 10 ठिकाणी त्या त्या भागात माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्याकडे नियोजन दिले आहे.
आता कांदा काढणी मशील ठरतेय फायदेशीर, शाहू अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची कमाल
यामध्ये चुलीवरचे मटण भाकरी इंद्रायणी भात जिलेबी आणि गुलाबजामून असा बेत आहे. तसेच २१०० किलो मटन, तेवढेच चिकण, बाराशे ३० किलोचे मासे, १३ हजार अंड्यांची व्यवस्था या पार्टीसाठी करण्यात आली आहे. मंगल कार्यालयात जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या;
सर्वात लहान शेळी आणि सर्वात जास्त पैसे मिळवून देणारी शेळी, शेतकऱ्यांना होणार फायदा
१४ चा उतारा बसला आणि १० चा बसला तरी समान बाजारभाव का? कष्टकरी ऊस उत्पादकांवर होतोय अन्याय
रामराजे नाईक निंबाळकर भाजपमध्ये जाणार? सातारा जिल्ह्यातील आमदाराच्या वक्तव्याने खळबळ
Share your comments