Cotton Rate: देशातील खरीप हंगाम (Kharip Season) सध्या अंतिम टप्प्यात आला आहे. या यंदाच्या खरीप हंगामामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे कापूस उत्पादकांचे (Cotton Growers) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे अजूनही कापूस (Cotton) आहे त्यांना सुगीचे दिवस येण्याची चिन्हे दिसत आहेत.
यंदाच्या मान्सून (Monsoon) शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. अजूनही महाराष्ट्रात (Maharashtra) मान्सूनचे जोरदार सत्र सुरूच आहे. शेतात पाणी साठल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच पावसामुळे यंदाचा कापूस उशिरा निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच उत्पादन घटण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
यंदा कापूस लागवडीच्या क्षेत्रात 3 लाख हेक्टरने वाढ झाली आहे. म्हणजेच सध्या देशात एकूण 42 लाख 29 हजार हेक्टर इतके क्षेत्र कापसाच्या लागवडीखाली आहे. त्याचवेळी सध्या कापसाचे दर स्थिर आहेत. 15 सप्टेंबरला पाऊस परतीचा प्रवास उरकून गायब होतो. परंतू यंदा महिन्याच्या शेवटपर्यंत पाऊस राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यात लम्पीचा कहर! शेकडो जनावरांचा मृत्यू; सरकारकडून मिळणार मदत
याच कारणामुळे नवा कापूस बाजारात (Cotton Market) उशिरा दाखल होऊ शकतो. नवा कापूस बाजारात उशिरा दाखल झाल्यास बाजारात कापसाची आवक कमी होईल आणि याच कारणामुळे कापसाच्या दरात नोव्हेंबर महिन्यात होऊ शकते.
याचा फायदा ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कापसाची लवकर पेरणी केली होती त्या शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून कापसाचे दर स्थिर असल्याने नोव्हेंबर महिन्यात कापसाला उच्चांकी भाव मिळण्याची शक्यता आहे.
मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत धो धो बरसणार; हवामान खात्याने दिला मुसळधार पावसाचा इशारा
मान्सूनच्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासाठी राज्य सरकारने ३ हजार ५०० कोटींची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. ही नुकसान भरपाईचे वितरण सुरु झाले आहे. लवकरच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होऊ शकते.
महत्वाच्या बातम्या:
तेलाच्या किमतीत जोरदार घसरण! पेट्रोल डिझेलचे नवीनतम दर जाहीर...
सणासुदीच्या काळात सोन्याचे भाव घसरले! प्रति 10 ग्रॅम सोने 6880 रुपयांनी स्वस्त
Share your comments