Cotton Rate | राज्यात कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर कापसाची शेती करतात. या शेतीवर अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण सुरु असते. असे असताना आता या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा बाजारात कापूस तेजीत राहणार आहे. असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. तसेच याची कारणे देखील सांगितली आहेत.
यंदा अतिवृष्टीमुळे राज्यात, देशात तसेच परदेशात देखील शेती (Agriculture) पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक (Financial) फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी केलेला खर्च देखील निघाला नाही. यामुळे उत्पादन घटले असून यंदा कापूस उत्पादनात (Cotton production) घट होण्याची दाट शक्यता आहे.
अनेक शेतकऱ्यांनी यंदा कापूस लागवड केली, यामुळे लागवडी चांगली वाढ झाली होती. असे असताना जगभरात पावसामुळे उत्पादनात घट होण्याची चिंता सरसावत आहे. यंदा देशातील कापूस लागवडीच्या क्षेत्रात 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता देखील आहे.
बातमी कामाची! पीक नुकसानीचे 1106 कोटी आले; उद्यापासून बँक खात्यांत होणार जमा
असे असताना जागतिक बाजाराचा विचार केला तर महागाई प्रचंड वाढली आहे. याचा परिणाम कापसाच्या दरावर होऊ शकतो. यामुळे तज्ञांच्या मते भाव तेजीत राहण्याची शक्यता आहे. पाकिस्तान, अमेरिका, सिंध प्रांत आणि पंजाबसह बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणावर कापसाचे उप्तादन घेतले जाते. असे असताना मात्र याठिकाणी मोठा पाऊस झाला आहे.
नोकरीला काय करता, डाळिंबाची लागवड करून अवघ्या सातशे झाडांपासून कमावले १८ लाख रुपये
यामुळे पावसामुळे कापूस उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज आहे. यामुळे भारतीय बाजारपेठेत कापसाची मागणी वाढू शकते. यंदा मध्यम धागा कापसासाठी ६००० रुपये, तर लांब धागा कापसासाठी ६३८० प्रति क्विंटल हमीभाव मिळाला आहे. त्याचवेळी यंदा कापसाला किमान ८ ते १० हजार रुपये इतका भाव मिळू शकतो. यामुळे याचा शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
दुधाचे दर पुन्हा वाढणार, मदर डेअरी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्याची शक्यता
माळेगावला गावे जोडण्यास सभासदांचा विरोध, शेतकरी न्यायालयात जाणार
शेतकऱ्यांनो घोणस अळीचा विषारी दंश झाला तर लगेच करा 'हे' उपाय
Share your comments