मागच्या वर्षी आपण कापसाच्या एकंदरीत भावाची जी काही परिस्थिती पाहिली तीच परिस्थिती यावर्षी राहील की नाही या बाबतीत अजूनही गोंधळल्यासारखे परिस्थिती आहे.आजचा विचार केला तर जे काही प्रमुख कापूस उत्पादक पट्ट्यात येते म्हणजे मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश मधील जळगाव,धुळे नंदुरबार तसेच नाशिक जिल्ह्याच्या काही भागात कपाशी लागवड मोठ्या प्रमाणावर होते.
तसे पाहायला गेले तर या परिसरातील सर्व शेतकऱ्यांच्या आर्थिक गणित कापूस या पिकावर अवलंबून आहे. परंतु जर एकंदरीत या क्षेत्रातील तज्ञांचा किंवा बाजारपेठेचा अंदाज जर बांधला तर काही दिवसात कापसाला चांगला बाजारभाव मिळू शकतो असे जाणकारांचे देखील म्हणणे आहे.
नक्की वाचा:Agri News: यावर्षी पणन महासंघ फक्त सुरू करणार 50 कापूस खरेदी केंद्रे, वाचा सविस्तर
एकंदरीत कापसाची जागतिक परिस्थिती
जर आपण तज्ञांच्या माहितीचा विचार केला तर मागील काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर कापड बाजारांमध्ये आणि उद्योगांमध्ये बर्याच प्रकारच्या अडचणी होत्या.
वाढत्या मागणीमुळे मंदीचे सावट देखील होते. या दरम्यानच्या कालावधीमध्ये भारतात काहीशी परिस्थिती सुधारत असल्याचे चित्र आहे. त्यासोबतच सणासुदीचे दिवस तोंडावर आल्याने कपड्याच्या मागणीत देखील वाढ होत आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील येत्या महिन्यापासून कापड बाजार पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा आहे व या परिस्थितीचा फायदा भारतीय कापसाला होणार असल्याचे देखील म्हटले जात आहे.
जर आपण अमेरिका,चीन सारख्या कापूस उत्पादक राष्ट्राचा विचार केला तर या ठिकाणी हवामानाच्या परिणामामुळे कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट आलेली असून काही दिवसांमध्ये भारतीय कापसाला आंतरराष्ट्रीय मागणी देखील वाढेल व भारतीय शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव मिळेल असे देखील म्हटले जात आहे.
आपल्याकडे कापसाची परिस्थिती
सध्या आपल्याकडे विचार केला तर सध्या नविन कापूस बाजारमध्ये येत आहे परंतु तो पाऊस झाल्यामुळे त्याचे प्रत खालावलेली असल्यामुळे बऱ्याच अंशी ओला आहे. त्यामुळे साहजिकच अशा कापसाला दर देखील कमी मिळतील परंतु येणाऱ्या काळात कापसाचा दर्जा सुधारणार तेव्हा बाजार भाव देखील वाढ होईल अशी अपेक्षा आहे
त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कापूस चांगला भावात विकला जाईल अशी परिस्थिती असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले असून या परिस्थितीत कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनी कापूस विक्रीचे नियोजन करताना खूप काळजीपूर्वक करण्याची गरज असून टप्प्याटप्प्याने विक्री करणे गरजेचे आहे व बाजारपेठेचा अंदाज घेऊनच विक्रीचे नियोजन करावे असा देखील मोलाचा सल्ला या क्षेत्रातील लोकांकडून शेतकरी बांधवांना देण्यात आला आहे.
नक्की वाचा:शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! बाजारात बाजरीची किंमत वाढली; विकली जातेय 'या' दराने
Share your comments