कोरोनाच्या भीतीमुळे आयुर्वेदिक उत्पादनांच्या विक्रीत वाढ

Monday, 16 March 2020 05:08 PM


देशातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. देशातील रुग्णांची संख्या शंभरी पार झाली आहे, तर महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३२ झाली आहे. या आजारापासून वाचण्यासाठी नागरिक अनेक उपाय करत आहेत. कोणी गो-मुत्रचा वापर करत आहे. तर कोणाकडून शेणांचा उपयोग सांगण्यात येत आहे. परंतु यासगळ्यांचा काहीच उपयोग होत नाही. कोरोनावरती कोणतीच लस उपलब्ध झालेली नाही. याच दरम्यान नागरिकांचा आयुर्वेदिक औषधांकडे ओढा वाढला असून आयुर्वेदिक उत्पादनांनी विक्रीत उचल घेतली आहे.

इम्युनिटी सस्टिम मजबूत झाल्यास कोरोना व्हायरसपासून वाचता येईल, असा दावा आयुर्वेदच्या तज्ज्ञांनी केला आहे. चीनच्या वुहानपासून सुरू झालेल्या या व्हायरसने आतापर्यंत जगातील १ लाख २७ हजार ०७० जणांना संक्रमित केले आहे. तर ४ हजार ६८७ जणांचा मृत्यू या आजाराने झाला आहे. ११५ देशात हा व्हायरस पसरला आहे. यादरम्यान काही लोकांनी आपली इम्युनिटी सस्टिम व्यवस्थित राहावी यासाठी आयुर्वेदिक औषधे आणि इतर उत्पादनांचे सेवन करणे सुरू केले आहे. आयुर्वेद, योग आणि नैसर्गिक चिकित्सासह रोगप्रतिरोधक क्षमता मजबूत करण्याचे अनेक उपाय समोर येत आहेत. पण आयुर्वेदामुळे कोरोना बरा होत नसल्याचे डॉक्टर्सकडून सांगण्यात येत आहे.

ग्रोफर्स आणि हिमालया सारख्या फर्मा कंपनीसह एयूरिक सारख्या नव्या कंपन्यांचे हेल्थ ब्रांडची विक्री वाढत आहे. च्यवनप्राश आणि  हर्बल टी ची विक्री वाढली आहे. मासिक आधारानुसार, या उत्पादनांची विक्री १७-१८ टक्क्यांनी वाढली असल्याचे मिल्क बास्केट यांनी सांगितले. मिल्क बास्केटमधून हेल्थ ड्रिंक आणि विटामिन सारख्या हेल्थ सप्लीमेंटची विक्री वाढत आहे. मागील काही आठवड्यात हिमालयाच्या हॅण्ड सेनेटाईजर आणि हॅण्ड वॉशच्या विक्रीत १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर इम्युनिटी वाढवणाऱ्या औषधांची विक्री ३ टक्क्यांनी वाढली आहे.

Coronavirus ayurveda ayurveda product कोरोना व्हायरस आयुर्वेद आयुर्वेद औषध

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.