1. बातम्या

कोरोना व्हायरसमुळे हापूस आंब्याची परदेश वारी थांबली

मुंबई कृषी उत्पन्न् बाजार समितीच्या वाशी येथील फळ बाजारात हापूस आंबा दाखल झाला आहे. वातावरणाचा फटका बसल्याने बाजारातील आवक कमी आहे.

KJ Staff
KJ Staff


मुंबई कृषी उत्पन्न् बाजार समितीच्या वाशी येथील फळ बाजारात हापूस आंबा दाखल झाला आहे. वातावरणाचा फटका बसल्याने बाजारातील आवक कमी आहे. यात कोरोनाने देशभरात थैमान घातले आहे. यामुळे खरेदी करणारे नसल्याने आंब्याला उठाव नाही. शिवाय निर्यातही ठप्प असल्याने कोकणातील हापूर आंबा बागायतदार आणि व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे.

देशातील लॉकडाऊनचा फटका हापूस आंबा बागायतदारांना बसत आहे. हापूसच्या सुमारे हजारो पेट्या सध्या पडून आहेत. यामुळे आत्ताच निर्णय न झाल्यास आंबा बागायतदार संकटात येण्याची शक्यता आहे. हापूस आंब्याचे कोकणात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. साधारण ४ लाख एकरावर हापूसचे उत्पादन घेतले जाते. त्यावर जवळपास ३ ते ४ कोटी डझन आंबा तयार होतो. त्यापैकी काही लाख पेट्या मुंबई, पुणे व नाशकात विक्री करण्यासाठी बागायतदारांनी सज्ज केल्या आहेत. परंतु सध्याच्या घडीला हापूसला कुठेच मागणी नाही. एकूण उत्पादनाच्या ४० टक्के आंबा आखाती देशात निर्यात होतो. तर ६० टक्के हापूसची स्थानिक बाजारात विक्री होते. मुंबई बाजार समितीमध्ये साधारणपणे ७० ते ८० निर्यातदार आहेत. हे व्यापारी एअर कार्गोमधून परदेशात भाजीपाला, फळे पाठवतात. आंब्याचीही निर्यात केली जाते परंतु चीनमध्ये थैमान घालणाऱ्या कोरोनामुळे निर्यात बंद आहे. पूर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजवला आहे, याचा फटका हापूस आंबा निर्यातीला बसला आहे.

English Summary: corona virus affect on Alphonso export Published on: 06 April 2020, 12:29 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters