कोरोना : लॉकडाऊन नाही पाळला तर होणार २ वर्षाची शिक्षा

25 March 2020 12:22 PM


देशभऱात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. कोरोना विषाणूच्या संक्रमण चक्राला तोडण्यासाठी सोशल डिस्टंस हाच उपाय असल्याने हा लॉकडाऊन करण्यात येत आहे. जनतेला दुखी होण्याचे काम नसून जिवाश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित होणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. कामाऐवजी तुम्ही घराबाहेर पडला तर तुम्हाला हे महागात पडू शकते.

कारण लॉकडाऊनचा नियम नाही पाळला तुम्हाला तुरुंगवास होऊ शकतो. हो, जर तुम्ही  लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करत असला तर  तुम्हाला २ वर्षाची शिक्षा होऊ शकते.  २१ दिवसांचा लॉकडाऊन दरम्यान जर कोणी नियम आणि सुचनांचे पालन नाही केले तर त्यांच्यावर आपत्कालीन कायदा कलम ५१ अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.  यामध्ये शिक्षा आणि दंड दोन्ही होणार आहे. लॉकडाऊन न पाळल्याने २०० रुपये दंड आणि एक महिन्याचा तुरुंगवास अशी शिक्षा आहे. पण यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडत असेलत तर दंगलपरिस्थीत ६ महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो. तसेच जर तुम्ही नियमांचे पालन करत नसाल आणि तुमच्यामुळे इतरांच्या जीवाला धोका पोहोचत असेल तर तुम्हाला २ वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते. यासह अफवा पसरवल्यावरही शिक्षा होणार आहे. दरम्यान शेतीविषयी एक दिलासादायक बातमी आहे.

राज्यातील बाजार समित्या सुरू राहणार आहेत.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याविषयीचे निर्देशही दिले आहेत.  कोरोनाविषयी सरकार कठोर पावले उचलत आहे. या आजाराविषयी जनजागृती सरकारकडून केली जात आहे.  कोरोनाविषयी अफवा पसरविल्यास शिक्षा करण्याची तरतुदही सरकारने  केली आहे.   गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार कोरोनाबाबत कोणत्याही प्रकारची अफवा पसरवली तर १ वर्षापर्यंतची शिक्षेसह  दंडही भरावा लागेल. दरम्यान या लॉकडाऊन विषयी प्रत्येक राज्य सरकार कठोर भूमिका घेत आहे. तेलगंणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नागरिकांना सज्जड दम दिला आहे. नागरिकांनी संयमात राहिले पाहिजे, गोळी मारण्यास भाग पाडू नका असा इशारा त्यांनी दिला आहे.

corona virus narendra modi state government lockdown कोरोना व्हायरस लॉकडाऊन नरेंद्र मोदी राज्य सरकार तुरुंगवास jail
English Summary: corona : two years jail to if not follow the lockdown rules

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.