1. बातम्या

कोरोनाचा फटका ; बोकडांना मागणी कमी असल्याने शेळीपालक अडचणीत

KJ Staff
KJ Staff

पुणे  : कमी खर्चात अधिक उत्पादन देणारा व्यवसाय म्हणजे शेळीपालन. शेळीपालकांसाठी बकरी ईद या सण अती महत्त्वाचा असतो. या सणावेळी बकऱ्यांना आणि बोकड्यांना मोठी मागणी राहत असते.  बकरी ईद असली तर बोकड्यांना मिळणारी किंमत ऐकून आपण थक्क होत असतो. पण यंदा मात्र शेळीपालकांसाठी ही ईद संक्रात बनून आली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बकरी ईद साध्या पद्धतीने  साजरी आव्हान केले आहे. लोकांनी स्वतःहून साधेपणाने ईद साजरी करण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे यंदा शेळीपालन करणारा शेतकरी अडचणीत सापडला आहे.  राज्यात बकरी ईद मोठ्या प्रमाणात  साजरी केली जाते. या दिवशी बोकडाची कुर्बानी दिली जाते. दरवर्षी हा सणाच्या वेळी असलेली मागणी लक्षात घेऊन शेतकरी जोडधंदा  म्हणून शेळी आणि बोकडांचे संगोपन करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होतो आणि शेतीसाठी खत मिळते. परंतु यावर्षी मात्र चित्र वेगळे आहे. यावर्षी कोरोनामुळे बोकडाना मागणी कमी आहे. इतर हंगामात बोकड जास्त विकले जात नाहीत.  त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक नुकसान सहन करावा लागणार आहे.

 


पुण्याजवळील डोणजे गावातील शेळीपालन करणारे शेतकरी सुरज पायगुडे कृषी जागरणशी बोलताना म्हणाले की, “माझ्याकडे एकूण ५० प्राणी आहेत. मगील वर्षाच्या बकरी ईदला २० बोकड विकेल गेले होते. यावर्षी मात्र अवघे ५  बोकड विकले गेले आहेत. यावर्षी मला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. बोकडाची त्वचा एकदा जाड झाली कि त्याला कोणी घेत नाही. त्यामुळे हा भुर्दंड शेतकऱ्यांवर पडतो. एक बोकडाला साधारणपणे वर्षाला ५ ते ६ हजार खर्च येतो. त्यामुळे हे वर्ष नुकसानीत जाणार आहे.”

कोरोनामुळे यावर्षी ग्रामीण भागात जत्रा झाल्या नाहीत. या जत्रांमध्ये मोठया प्रमाणात बकरी, बोकडांना मागणी असते. महत्वाचा हंगाम गेल्याने शेळीपालन करणारे शेतकरी संकटात सापडले आहेत.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters