कोरोना : बाजार समित्या सुरू ठेवा, उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

Wednesday, 25 March 2020 10:26 AM
(photo - ANI)

(photo - ANI)


आजपासून पूर्ण देशात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन असणार आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल रात्री याची घोषणा केली होती.  कोरोना व्हायरसने देशात थैमान घातले आहे. कोरोना विषाणूच्या  संक्रमण  चक्राला  तोडण्यासाठी सोशल डिस्टंस हाच एक उपाय असल्याने देशात लॉकडाऊन केला जाणार आहे.  या लॉकडाऊनमध्ये जिवाश्यक वस्तूऐवजी कोणत्याच सेवांचा लाभ आपल्याला मिळणार नाही.  दरम्यान राज्यातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदी लागू केली होती.  या बंदीमुळे बाजार समित्या बंद करण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून आणि इतर घटकांकडून केली जात होती.  यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांना शेतमालाची चिंता सतावत होती.

 दरम्यान भाजीपाल्यांचा दर वाढू शकतो आणि  याचा फटका नागरिकांना बसेल याची दक्षता घेत,  राज्य सरकारने मात्र बाजार समित्या सुरू ठेवाव्यात सांगितले  आहे.  याविषयीचे निर्देश  उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी दिले आहेत.  शहरांचा भाजीपाला व फळांचा पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी व्यवहार सुरू ठेवलेच पाहिजेत, असे त्यांनी  बजावले आहे.   त्यासाठी पोलिस आणि स्थानिक प्रशासनाचे पूर्ण सहकार्य मिळेल,  याची ग्वाही त्यांनी दिली आहे.  कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा धोका असल्याने व्यापाऱ्यांसह विविध घटकांनी बाजार समित्यांमधील व्यवहार बंद ठेवण्याची भूमिक बैठका घेऊन जाहीर केली होती.  त्यातून भाजीपाला टंचाई, भाववाढीचा फटका नागरिकांना सहन करावा लागला असता.  शहरांमधील किरकोळ विक्री करणाऱ्या मंड्या व बहुतांश दुकाने बंद असल्याने नागरिकांनी बाजार समित्यांकडे धाव घेतली.  यामुळे बाजार समित्यांमध्ये गर्दी झाली होती.   गर्दी झाल्यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. यामुळे शहरांतील छोट्या- मोठ्या मंड्या दररोज सकाळी दोन तास नागरिकांसाठी सुरू ठेवण्याची सुचना पणन खात्याने केली असून त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.

व्यापार संघटना पोलिस दल कोरोना व्हायरस कृषी उत्पन्न बाजार समिती उपमुख्यमंत्री अजित पवार राज्य सरकार agriculture market committee deputy cm ajit pawar state government corona virus police मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.