1. बातम्या

शेतकरी आणि ग्राहकांसाठी 'कॉप शॉप' उपक्रम फायदेशीर

मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालास योग्य भाव मिळावा आणि शहरी भागातील गृहनिर्माण संस्थेतील ग्राहकांना रास्त दरात ताजा आणि स्वच्छ शेतीमाल मिळावा म्हणून शासनाने कॉप शॉप हा उपक्रम सुरू केला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्थांशी जोडल्याने या योजनेतून रोजगार निर्मितीस चालना मिळाली आहे. त्यामुळे अशा योजनांचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.

KJ Staff
KJ Staff


मुंबई:
राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालास योग्य भाव मिळावा आणि शहरी भागातील गृहनिर्माण संस्थेतील ग्राहकांना रास्त दरात ताजा आणि स्वच्छ शेतीमाल मिळावा म्हणून शासनाने कॉप शॉप हा उपक्रम सुरू केला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्थांशी जोडल्याने या योजनेतून रोजगार निर्मितीस चालना मिळाली आहे. त्यामुळे अशा योजनांचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.

श्री. देशमुख म्हणाले की, शेतीमालाच्या थेट विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी अटल महापणन विकास अभियानाअतंर्गत राज्यातील शहरी भागातील सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये कॉप शॉप उपक्रम सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीतून थेट लाभ होत आहे. आतापर्यंत शहरी भागातील शंभराच्यावर गृहनिर्माण संस्थांमध्ये कॉप शॉप सुरू झाले आहेत.

ग्राहकांनासुद्धा योग्य दरात ताजा आणि वैविध्यपूर्ण भाज्या, फळे, धान्यासह गरजेच्या वस्तू मिळत आहे. शासनाने अटल महापणन विकास अभियानांतर्गत 5 हजार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, शेतकरी उत्पादक कंपन्या, बचत गट यांच्या शेती उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी शहरी भागातील गृहनिर्माण संस्थामध्ये कॉप शॉप सुरू केले आहे.

मुंबईत-67, ठाणे-15, पालघर-3, रायगड-2, पुणे-20, पनवेल-2,अमरावती-1 व नागपूर-1 असे एकुण 111 कॉप शॉप सुरू झाले आहेत.सदर कॉप शॉपसाठी शेतमाल जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड, मुरबाड, शहापूर, पुणे, जुन्नर, नाशिक, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, अमरावती व नागपूर या भागातील सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्या या शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांशी जोडले आहेत. शेतकऱ्यांचा शेतमाल आठवड्यातून ठरवून दिलेल्या दिवशी सोसायटयांपर्यत पोहचविण्यात येत आहे.

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातील 1,000 गावांतील शेतकऱ्यांना या कॉप शॉप सारख्या उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी शेतकऱ्यांना सहकारी संस्थांशी जोडण्यात येत आहे. शहरी भागात शेतीमाल आणताना सहकारी संस्थांची अडवणूक होणार नाही, शेतीमालाच्या वाहतूक, विक्री आणि साठवणूकीसाठी सोयी सुविधा पुरविण्यात येत आहे. तसेच गृहनिर्माण संस्थांमध्ये ग्राहकांना रास्त दरात ताजा आणि स्वच्छ शेतीमाल (अन्नधान्य, फळे, भाजीपाला) प्रक्रिया उत्पादने उपलब्ध होत आहेत, असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.

English Summary: Cop Shop initiative is Profitable for Farmers & Consumers Published on: 19 February 2019, 07:18 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters