1. बातम्या

राज्यात वाढणार नवीन सहकारी कारखाने? कारखान्यांना परवानगी देण्याची मागणी

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सहकारी साखर कारखाने अडचणीत आले आहेत. असे असताना राज्यात आता राज्यात नवीन सहकारी साखर कारखान्यांना बैंकत खाते उघडण्यास नोंदणी करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी साखर उद्योगातील तज्ञ व नवदिप शोसल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष साहेबराव खामकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले.

cooperative factories grow in the state

cooperative factories grow in the state

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सहकारी साखर कारखाने अडचणीत आले आहेत. असे असताना राज्यात आता राज्यात नवीन सहकारी साखर कारखान्यांना बैंकत खाते उघडण्यास नोंदणी करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी साखर उद्योगातील तज्ञ व नवदिप शोसल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष साहेबराव खामकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले.

राज्यात मोठे सहकार क्षेत्र आहे. याचा पाया 1950 मध्ये राज्यात रोवला गेला. आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखना सन १९५० मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये प्रवरानगर येथे स्थापन झाला. सहकारी साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागाचा कायापालट सर्वाधिक झाला आहे. अनेकांचे जीवन यामुळे फुलले आहे.

या माध्यमातून रोजगार, शिक्षण, रस्ते नोकरी, व्यापार, सिंचन यांसह अनेक सोई सुविधा ग्रामीण भागामध्ये उपलब्ध झालेल्या आहेत. सहकार चळवळ देशासाठी पथदर्शी ठरली आहे. यामुळे अनेकांचे फायदे झाले. खामकर यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने सन २००२ पासून नवीन सहकारी साखर कारखान्यांना बँकेत खाते उघडण्यास परवानगी बंद केलेली आहे.

अजितदादांचा वाढदिवस, आणि शहाजी बापू पाटलांच्या पत्नीला पाठवली साडी, वाचा नेमकं काय झालं..

सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये अंदाजे २०० साखर कारखाने असून त्यापैकी फक्त १०० सहकारी कारखाने आहेत. त्यातच नवीन सहकारी साखर कारखान्यांची नोंदणी बंद केल्यामुळे नवीन सहकारी साखर कारखाने होऊ शकत नाहीत. यामुळे याची मागणी केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या;
सरकारचे हे कार्ड शेतकऱ्यांचे उत्पन्न करणार दुप्पट, शेतकऱ्यांनो जाणून घ्या सर्व माहिती
फक्त १८ दिवसात तयार होणारे हे खत शेतकऱ्यांना देत आहे नवसंजीवनी, घरीच करा तयार...
तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा धक्का! मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय..

English Summary: cooperative factories grow in the state? Demand for permission to factories Published on: 25 July 2022, 01:20 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters