1. बातम्या

दूरदर्शन आणि आकाशवाणीवर सर्वसमावेशक हवामान वृत्त

एकीकडे देशभरात तापमानाचा पारा वाढत असतांना, दूरदर्शन आणि आकाशवाणी या सार्वजनिक प्रसारण सेवांवरच्या ‘सर्वसमावेशक’ हवामान वृत्ताने देखील देशभरातील प्रेक्षक आणि श्रोत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. डीडी न्यूजवर दररोज सकाळी आणि संध्याकाळी हवामान वृत्त दिले जाते. तर आकाशवाणीच्या जवळपास प्रत्येक प्रमुख बातमीपत्रात, हवामान विषयक महत्वाच्या बातम्या दिल्या जातात. डीडी किसान वाहिनीवर हवामान विषयक विशेष वृत्त असते, त्याशिवाय, दररोज, प्रत्येकी अर्ध्या तासाची तीन विशेष हवामान विषयक बातमीपत्रे असतात आणि प्रत्येकी पाच मिनिटांची चार बातमीपत्रे असतात.

KJ Maharashtra

या हवामानविषयक वृत्तपत्रात देशातील कानाकोपऱ्यातील प्रत्येक बारीकसारीक तपशील दिले जातात, तसेच देशातील हवामानविषयक तीव्र स्वरुपाच्या स्थितीचा अंदाज आणि वर्णनही केले असते. काश्मीरपासून ते कन्याकुमारी पर्यंत, गिलगीट ते गुवाहाटी आणि बाल्टीस्तान ते पोर्ट ब्लेअरपर्यंतच्या हवामानविषयक स्थितीची माहिती आणि विश्लेषण केले जाते. या हवामानविषयक वृत्तांत, विविध प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी काही मार्गदर्शक सूचना, हंगामी पिकांसाठी काय करावे-काय करु नये याचा सल्ला आणि कृषीतज्ञांकडून मार्गदर्शन देखील केले जाते. या राष्ट्रीय वाहिन्यांव्यतिरिक्त, दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्तपत्रांमध्ये देखील संबंधित प्रादेशिक भाषांमध्ये हवामानवृत्त दिले जाते. ही सगळी बातमीपत्रे दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या युट्यूब वर देखील उपलब्ध आहेत.

ताजे हवामान वृत्त खाली दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.

English Summary: Comprehensive weather report news on doordarshan television and radio Published on: 14 May 2020, 08:50 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters