1. बातम्या

दगावलेल्या जनावरांची नुकसान भरपाई द्या;दोषीवर कारवाईची मागणी

KJ Maharashtra
KJ Maharashtra
दगावलेल्या जनावरांची नुकसान भरपाई द्या;दोषीवर कारवाईची मागणी

दगावलेल्या जनावरांची नुकसान भरपाई द्या;दोषीवर कारवाईची मागणी

चिखली- पशुवैद्यकांनी पुकारलेल्या संपाची झळ बळीराजाला बस लागली आहे. वारंवार माहिती देवूनही मुरादपुर येथील शेतकऱ्यांची बकरीवर इलाज झाले नसल्याने दगावल्याची घटना दि०४ आॅगस्ट रोजी घडल्याने तिच बकरी घेवून स्वाभिमानीचे नितिन राजपूत, विनायक सरनाईक यांनी आक्रमक पावित्रा घेत चिखली पशुसंवर्धन कार्यालयात ठिय्या आंदोलन केले आहे. दोषींवर कारवाई करुण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.

सद्या पावसाळा सुरू आहे. शेतकरी शेतीकामात व्यस्त आहे. पशुधनावर अनेक शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालत असतो पावसाळ्यामध्ये जनावरे बिमार पडण्याचे प्रमाण हे सर्वाधिक असते आणि हिच संधी शोधून पशुवैद्यकीय अधिकार्यामध्ये पदविका विरुद्ध पदवीधर यांचा वाद पेटला असल्याने याची झळ शेतकर्याना बसली आहे. मोठे आर्थिक नुकसान शेतकर्याचे झाले आहे.असे असतांना संप मिटला तरीसुद्धा पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी दवाखाण्यात उपस्थीत नसल्याने मुरादपुर येथील शेतकरी सिद्धेश्वर गाडेकर यांची बकरी पशु संवर्धन विभागाच्या हलगर्जी पणामुळे दगावली असल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर असे की,गाडेकर यांच्याकडे १२ बकऱया आहेत. त्यांनी रोख 15 हजार देवून बाजारामधून तिन पिलं देणारी गामण बकरी खरेदी केली होती. ते आजारी पडल्यामुळे इलाजासाठी वारंवार पशुसंवर्धन विभागाचे अधिकाऱ्यांना वारंवार संपर्क केला परंतु कुणीच न आल्याने बकरीला कोलारा येथील पशुसंवर्धन कार्यालयात इलाजास्तव आणले परंतु त्या ठिकाणी कुणीही जबाबदार अधिकारी व मॅडम नसल्याने त्यांना संपर्क साधला तेव्हा डॉक्टरला पाठवते म्हणुन सांगितले गेले.

 

परंतु दोन तास उलटुन सुद्धा कुणी आले नसल्याने बकरीचा इलाज करणे आवशक असल्याने तिला अॅपेव्दारे चिखलीला आनले परंतु वेळीत उपचार झाला नसल्याने बकरी दगावल्याची माहिती शेतकऱ्याने स्वाभिमानीच्या पदाधिकारी यांना दिल्याने स्वाभिमानीचे नितिन राजपुत, विनायक सरनाईक, अनिल वाकोडे यांनी चिखली पशुसंवर्धन कार्यालय गाठले.

परंतु तिथे सुद्धा कुणीच अधिकारी उपस्थीत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पावित्रा घेत दगावलेली बकरीच थेट पशुसंवर्धन कार्यालयात ठेवुन ठिय्या आंदोलन सुरू केले. दरम्यान तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, पशुसंवर्धन विभागाच्या हलगर्जी करणाऱ्या अधिकारी व संबंधीत दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी लेखी पत्राव्दारे केली आहे. तर संपाच्या काळात तालुक्यात एकुण किती जनावरे दगावली याची चौकशी करुण त्या शेतकऱ्यांना सुद्धा पशुसंवर्धन विभागाने मदत द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडुन करण्यात आली आहे.

यावेळी विनायक सरनाईक,नितिन राजपुत,अनिल वाकोडे,मुरादपुर सरपंच अनंथा गाडेकर,शुभम पाटिल,राधाकिसन भुतेकर,सिद्धेश्वर गाडेकर,यांच्यासह आदि उपस्थित होते.

पशुसंवर्धन विभागास आली जाग..

शासनाने पाच दिवसाचा आठवडा केला आहे. परंतु कार्यालयाची वेळ वाढवून दिले आहे,असे असतांना सुद्धा या वेळेत पशुसंवर्धन विभागात जबाबदार अधिकारी नसल्याने स्वाभिमानीने अचानक पुकारलेल्या आंदोलनामुळे पशुसंवर्धन विभागातील अधिकारी यांची चांगलीच तारंबळ उडाल्याचे दिसून आले.
प्रतिनिधि गोपाल उगले

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters