सणासुदीच्या काळात सर्वसामान्य लोकांना आर्थिक (Financial) फटका बसण्याची शक्यता आहे. कारण या काळातच गव्हाच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. मात्र तांदूळ किमती घसरल्या आहेत.
आपण पाहिले तर एकीकडे गव्हाच्या किंमतीत (wheat price) वाढ होत आहे, तर दुसरीकडे तांदळाच्या किंमती कमी झाल्या आहे. अशावेळी गव्हाच्या किमतीबाबत सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे, कारण गव्हाच्या किंमतीमध्ये 4 टक्क्यांची वाढ झाली आहे. तांदळाच्या किमती पाहिल्या तर तांदूळ तब्बल 12 टक्क्यांनी कमी झाला आहे. याशिवाय गैर-बासमतीच्या किंमती 5 टक्क्यांपर्यंत घसरल्या आहेत.
गव्हाचे दर 2 हजार 525 ते 2 हजार 550 प्रति क्विंटलवर
माहितीनुसार एका महिन्यापूर्वी गव्हाचे दर 2 हजार 400 प्रति क्विंटल होते. मात्र सध्या गव्हाच्या किंमतीत वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये आता गव्हाचे दर हे 2 हजार 525 ते 2 हजार 550 प्रति क्विंटल झाले आहेत.
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! बाजारात बाजरीची किंमत वाढली; विकली जातेय 'या' दराने
तांदळाच्या उत्पादनात मोठी घट
कृषी मंत्रालयाने 2022-23 साठी प्रमुख खरीप पिकांच्या उत्पादनाचा पहिला आगाऊ अंदाज जाहीर केला आहे. यामध्ये चालू हंगामात 104.99 दशलक्ष टन खरीप तांदळाच्या उत्पादनाचा अंदाज वर्तविला आहे.
मात्र तांदूळ यावर्षी मागील वर्षीच्या तुलनेत 6 टक्क्यांनी कमी आहे. गेल्या हंगामात 111.76 दशलक्ष टन तांदळाचे उत्पादन झाले होते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (National Food Security Act) 2013 अंतर्गत वितरणासाठी तांदूळाची गरज लक्षात घेता खरीप तांदूळ उत्पादनात झालेली घट लक्षणीय आहे.
महत्वाच्या बातम्या
सावधान! राज्यातील 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
मेष, सिंह, तूळ राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा; जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य
मोठी वेलची शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणार; शेतकरी होणार मालामाल
Share your comments