हवामान अंदाज
भारतीय हवामान खात्याने आज वर्तविलेल्या पाच दिवसीय हवामान अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात दि. ११ ते १४ जानेवारी दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. दि.१५ जानेवारी रोजी जिल्ह्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
कृषी सल्ला
संभाव्य अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेता, शेतकऱ्यांनी कापणी/ मळणी केलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवण्याची व्यवस्था करावी.
तसेच बाजारपेठेत विक्रीसाठी असलेला शेतमाल प्लास्टिक शीटने किंवा ताडपत्रीने झाकून ठेवावा.
शेतकरी बंधूंनी शेतातील पेरणी, रोपे स्थलांतरण,ओलीत करणे, खत देणे, फवारणी व आंतरमशागत इ. शेती कामे संभाव्य अवकाळी पावसाचा अंदाज व स्थानिक हवामान परिस्थिती लक्षात घेऊन करावीत.
ढगाळ वातावरण व थंडीमुळे पिकांवर कीड-रोग यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
म्हणून कीड-रोग व्यवस्थापनासाठी लेबल क्लेम शिफारसीनुसार कीडनाशकांचा वापर योग्य वेळी व योग्य प्रमाणात करावा.
उन्हाळी भुईमुंगाची पेरणी कोरडे हवामान असताना करावी व शक्यतो रंद वरंबा सरी(बी.बी.एफ.) पद्धतीने करावी.शेतकरी बंधूंनी शेतातील पेरणी, रोपे स्थलांतरण,ओलीत करणे, खत देणे, फवारणी व आंतरमशागत इ. शेती कामे संभाव्य अवकाळी पावसाचा अंदाज व स्थानिक हवामान परिस्थिती लक्षात घेऊन करावीत.
पाच दिवसीय हवामान अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात दि. ११ ते १४ जानेवारी दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. दि.१५ जानेवारी रोजी जिल्ह्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. वरी दिल्याप्रमाणे कृषी सल्ला लक्षात घेउन शेतीची कामे करावीत ही विनंती.
Share your comments