1. बातम्या

"उद्घाटनाला येतो पण विरोधी पक्षनेता म्हणू नको; कधी काय होईल सांगता येत नाही", चर्चांना उधाण

नगर: राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar) हे आपल्या मिश्किल बोलण्याने नेहमी चर्चेत असतात. आज अजितदादा नगर जिल्ह्यांतील श्रीगोंद्या तालुक्याच्या दोऱ्यावर आहेत. तालुक्यातील पारगाव सुद्रीक विकास सोसायटी नवीन इमारतीचे अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

पाराजी आबासाहेब शिंदे
पाराजी आबासाहेब शिंदे
opposition leader Ajit Pawar

opposition leader Ajit Pawar

नगर: राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar) हे आपल्या मिश्किल बोलण्याने नेहमी चर्चेत असतात. आज अजितदादा नगर जिल्ह्यांतील श्रीगोंद्या तालुक्याच्या दोऱ्यावर आहेत. तालुक्यातील पारगाव सुद्रीक विकास सोसायटी नवीन इमारतीचे अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी त्यांनी कार्यक्रम आटोपला आणि जनतेशी संवादही साधला. . त्यावेळी एका कार्यकर्त्याने दादांना, तुम्ही उद्घाटनाला या, असं निमंत्रण दिले. त्यावर अजितदादांनी मिश्किल कोटी केली.

हो रे बाबा. मी येतो. मात्र विरोधी पक्षनेता (opposition leader) म्हणू नको. आता कधी काय होईल सांगता येत नाही. त्यांच्या मनात आलं आणि 20 लोक घेऊन गेले, आता सर्वत्र ओके ओके सुरू आहे, अशी कोटी अजित पवार यांनी केली. एकदम हास्यमय वातावरण तयार झाले.

पारगाव सुद्रीक विकास सोसायटी नवीन इमारतीचे अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी ही कोटी केली. या भागात पाणी कसे येईल यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. असं अजित पवार म्हणाले.

पाचुपते यांच्यासह नागवडे गटाला धक्का; श्रीगोंदा तालुक्यासाठी पवारांनी आखली रणनीती..

श्रीगोंदा तालुक्यासाठी पवारांनी आखली रणनीती

२०१९ च्या निवडणुकीत भाजपचे बबनराव पाचपुते आणि राष्ट्रवादीचे घनशाम शेलार यांच्यात रंगत लढाई झाली. या लढाईत पाचपुते यांनी बाजी मारली. आणि राष्ट्रवादीचा गड असणारा श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात गेला. आता आमदार बबनराव पाचपुते यांना घेरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने रणनीती आखली आहे.

खवय्यांसाठी आनंदाची बातमी: आता वर्षभर कोकणच्या 'हापूस'ची चव चाखता येणार

बाळासाहेब नहाटा आमदार पदाचे संभाव्य उमेदवार

राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत आज श्रीगोंद्यात हा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे बाळासाहेब नहाटा यांच्याकडे आतापासूनच संभाव्य उमेदवार म्हणून पाहिलं जाऊ लागलं आहे.

शिंदेचा ठाकरेंना मोठा धक्का; "राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीबाबत घेतला मोठा निर्णय"..

English Summary: Come to the inauguration but don't say opposition leader Ajit Pawar Published on: 03 September 2022, 02:35 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters