दि.८ मार्च २०२२ रोजी कृषि महाविद्यालय, अकोला येथे 'जागतिक महिला दिना'चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना, कृषी महाविद्यालय अकोला व झुआरी एग्रो केमिकल लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन कृषि महाविद्यालयातील विद्यार्थी खासकरून आर- आर सिरिज यांनी केले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले व कर्मवीर डॉ.भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करूण दिपप्रज्वलन करण्यात आले.सदर कार्यक्रमाला कृषि महाविद्यालय, अकोला चे सहयोगी अधिष्ठाता माननीय डाॅ. एस. एस माने हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणुन आर्युवेदाचार्ये व पंचकर्म तज्ञ डाॅ.पुजा राऊत ह्या होत्या.
तसेच कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेल्या महिला उद्योजक शुभांगी काळे व झुआरी ऍग्रो केमिकल्स लिमिटेड चे विपणन क्षेत्रातील प्रमुख व्यवस्थापक माननीय सलिल दीक्षित होते. तसेच कृषिशास्त्र शाखा प्रमुख माननीय डॉ.मंगला घणबहादुर व विस्तार शाखा प्रमुख माननीय डॉ.लांबे हे सुद्धा उपस्थित होते . महाविद्यालयामध्ये कृषी लोकशाही पंधरवडा निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये पोस्टर मेकिंग स्पर्धा, निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा व रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या गेल्या होत्या.विद्यार्थ्यांनी यामध्ये भरघोस प्रतिसाद दिला.पोस्टर मेकिंग स्पर्धेत एकूण 41 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यात प्रथम क्रमांक सोनाली डोळे हिने पटकावला. तर द्वितीय क्रमांक रोशनी परमार व तृतीय क्रमांक केतकी पाटील आणि रुचिता भिसे यांनी पटकावला.
रांगोळी स्पर्धेत एकूण नऊ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यात प्रथम क्रमांक कोमल बांदुरकर, द्वितीय क्रमांक गरिषा वार, तृतीय क्रमांक विशाखा धोटे यांनी पटकावला.वकृत्व स्पर्धेत एकूण 13 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता त्यात प्रथम क्रमांक पार्थ खंडेलवाल, व्दितिय क्रमांक आरती देशमुख, तृतीय क्रमांक संपदा ढोके आणि आचल कव्हर यांनी पटकावला. निबंध स्पर्धेत एकूण 74 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता त्यात प्रथम क्रमांक मयुरी खांबलकर, द्वितीय क्रमांक गंगासागर वैद्य, तृतीय क्रमांक शिवप्रभा गुळवे यांनी पटकावला. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉ. पूजा राऊत यांनी आयुर्वेदाची माहिती देऊन त्याचा उपयोग आपले आरोग्य सुधारण्यासाठी करावा असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या शुभांगी काळे यांनी त्यांचा दुग्ध व्यवसाय उभा करण्यासाठीचा संघर्ष व अनुभव विद्यार्थ्यांना सांगितला. तसेच झुआरी एग्रो केमिकल लिमिटेड चे मुख्य व्यवस्थापक सलिल दीक्षित यांनी झुआरी एग्रो केमिकल लिमिटेड ची सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली .कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांना अनेक इतिहासातील प्रेरणादायक स्त्रियांच्या उल्लेख करून विद्यार्थिनींना अधिकाधिक प्रगती करण्याच्या शुभेच्छा दिल्या .
महिला दिनाच्या निमित्ताने प्रतीक्षा टाले, संपदा ढोके,पुनम टेकाळे ,भाग्यश्री धोटे करिष्मा राजूभाई व अनंत कुमार वर्मा यांनी आपले मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री व्यवहारे हिने केले तर आभार प्रदर्शन श्रुती निचाट हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राम चांडक, श्रद्धा कटरे ,श्याम काळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आयोजक कार्यक्रम अधिकारी डॉ.खाडे हे सुद्धा उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणुन कृषि महाविद्यालय,अकोला चे प्राध्यापक वृंद डाॅ. कोकाटे , डॉ,वाळके ,प्रा.डांगोरे डॉ,तोटावार, डॉ, शेळके, डॉ भगत,डॉ, जेउघाले ,डॉ. झोपे, प्रा. ठाकूर , डाॅ. मारावार,डॉ चिकते मॅडम , डॉ.कणसे मॅडम ,डॉ.मोरे मॅडम,डॉ
सानप मॅडम,डॉ.कातोले मॅडम,डॉ.सातपुते मॅडम हे उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने कृषि महाविद्यालय अकोला,चे प्रथम,व्दितीय ,तृतीय वर्षाचे विद्यार्थी सुद्धा उपस्थित होते.
Share your comments