डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत कृषी महाविद्यालय अकोला येथे तीन दिवशीय दि. २३,२४ आणि २५ मार्च २०२२ आगळ्या वेगळ्या पद्धतीने वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू तथा या वार्षिक संमेलन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विलास भाले यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथी शिक्षणाधिकारी सौ. सुचिता पाटेकर मॅडम, व्यासपिठावर उपस्थित डॉ. वाय. बी.तायडे अधिष्ठाता (कृषी) डॉ. पं.दे. कृ.वी. अकोला , डॉ. एस एस. माने सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय अकोला, डॉ के. जे. कुबडे (संचालक विद्यार्थि कल्याण), सेक्रेटरी जिमखाना डॉ. एम. व्ही. तोटावर, स्नेहसंमेलन आयोजक सचिव डॉ. एस.पी लांबे, तसेच कृ. म. महाविद्यालय अकोला सर्व विभाग प्रमुख आणि विद्यार्थि प्रतिनिधि शिवराज गीते व विद्यार्थीनी प्रतिनिधि कांचन धूर्वे आदी उपस्थित होते. प्रसंगी मा. डॉ.विलास भाले सरांनी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणालेत की विद्यापीठांतर्गत शेतकऱ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम आणखी जोमाने राबवणार आहोत.
एक ऑनलाइन संकेतस्थळ कृषी ज्ञान या नावाने चालू केले आहे. या संकेतस्थळाची लॉन्चिंग विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.एम भाले यांच्या यांच्या हस्ते करण्यात आले. या संकेतस्थळावर शेतकऱ्यांना विविध शासकीय योजना, शेती संबंधित लेख व बातम्या, हवामान अंदाज, शेती क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान अशा प्रकारची माहिती त्वरित शेतकऱ्यांच्या मोबाईल कृषी ज्ञान या संकेतस्थळावर प्राप्त होईल. व या सर्व गोष्टींचा लाभ शेतकऱ्यांना होईल, हा या संकेतस्थळाचा उद्देश आहे. असे मत त्यावेळी सौरव गायकवाड या विद्यार्थ्यांने सांगितले.
मा. डॉ. एस. एस.माने सर सहयोगी अधिष्ठाता कृ. म. वि.अकोला यांनी आपले विचार व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व शिवराज गीते (विध्यार्थी प्रतिनिधि) याने कार्यक्रमाचे प्रस्ताविक सादर केले.
या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंतिम वर्षाचे विद्यार्थी ऋत्विक टाले व संध्या सावंत यांनी केले तर तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी शेतकरी आणि विद्यापीठ यांच्यातील महत्वाचे सबंध यावर एक नाटक सादर केले. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मयुर बोरगावकर याने केले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील शेटवच्या सत्रातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. गेल्या तीन ते चार दिवसांपासून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये क्रिकेट, हॉलीबॉल, बॅडमिंटन व इतर मैदानी खेळांचे व त्याचबरोबर वक्तृत्व स्पर्धा (१८ विद्यार्थी) , वादविवाद स्पर्धा (१२ विद्यार्थी) , उत्स्फूर्त भाषण (११ विद्यार्थी), फोटोग्राफी (३८ विद्यार्थी), बुद्धिबळ (३५ विद्यार्थी) स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Share your comments