ज्या ठिकाणी वनविभागाच्या जमिनी शेतकऱ्यांच्या जमिनींना लागून आहे, त्या ठिकाणी मोठमोठे चरे खोदण्यात यावी. जेणेकरून या चऱ्यामध्ये पाऊस पडल्यानंतर पाणी साचल्या जाईल.आणि त्या साचलेल्या पाण्यामधून वन्यप्राणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नुकसान करण्यासाठी जाणार नाही, असा प्रस्ताव माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी ५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांच्या
सोबत झालेल्या बैठकीत मांडला. या प्रस्तावाला जिल्हाधिकारी व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मान्यता दिलीThe Collector and Forest Department officials approved this proposalअसल्याची माहिती डॉ. शशिकांत खेडेकर यांनी दिली आहे.शेतकरी संघर्ष कृषि समितीच्या आंदोलनाची दखल घेत माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी शेतकऱ्यांना होणाऱ्या वन्य प्राण्यांच्या त्रासा बद्दल, पिकांच्या नुकसानी बाबत जिल्हाधिकारी आणी
मुख्यमंत्री यांचे पर्यंत शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. मुंबई मंत्रालयात वनविभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. तसेच ५ ऑगस्टरोजी जिल्हाधिकारी यांच्या सोबत झालेल्या बैठकीत चर्चा केली. यावेळी शेतकरी संघर्ष कृषि समितीच्या वतीने विजय घोंगे, संदीप पवार, गोळेगाव सरपंच रामेश्वर कोल्हे, सुनील खरात, अनिल चित्ते, रामदास कोल्हे आदी शेतकऱ्यांसह
वनविभागाचे सर्व वरिष्ठ अधिकार. कर्मचारी सुद्धा हजर होते. यावेळी डॉ. खेडेकर पुढे म्हणाले की, ज्या ठिकाणी चर खोदणे शक्य होणार नाही, त्या ठिकाणी दर्जेदार तार तार कंपाउंड करावे तसेच तार कुंपणासाठी शासनाकडून वन्यप्राणी ग्रस्त शेतकऱ्यांना विशेष अनुदान देण्यासाठी शासनाकडे शिफारस करावी, याचबरोबर तत्कालीन सरकारमध्ये
पीक नुकसानीच्या बाबत शासनाने २२ जुलै रोजी काढण्यात आलेले शासन परिपत्रक लागू करावे. याचबरोबर वन्यप्राण्यांमुळे शेडनेट व त्यातील पिकांचे नुकसान झाल्यास नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विशेष मोबदला वनविभागाच्या वतीने तत्काळ देण्यात यावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. सदर बैठकीला जिल्हा प्रशासनाने व वन विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून काही ठिकाणी लवकरात लवकर चरी खोदण्यात येणार य असल्याचे डॉ.शशिकांत खेडेकर यांनी सांगितले.
Share your comments