
Weather Update
राज्यातील अनेक शहरांचे तापमान कमी होवू लागले आहे. मागील महिन्यात पावसाने उघडीप दिल्याने राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवु लागला होता. कडक्याच्या उन्हामुळे अंगाची लाही लाही होत होती. परंतु आता गेल्या काही दिवसांपासून नागरीकांना ऑक्टोबर हिट पासून दिलासा मिळू लागला आहे.
हवामान विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यात नोव्हेंबरच्या सुरुवातीला थंडी वाढणार आहे. त्यामुळे रब्बीतील हंगामातील पेरणीला वेग आला आहे. काही दिवसांपासून राज्यातील तापमान कमी होऊ लागले आहे. तसेच गेल्या तीन- चार दिवसांत राज्यातील काही शहरांमधील तापमान २ ते ३ अंश सेल्सिअस कमी झाले आहे.
यावर्षी पाऊस कमी प्रमाणात झाल्याने थंडी कमी राहण्याची शक्यता आहे. याचा परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर होणार असून उत्पन्नात घट होण्याचीही शक्यता वर्तविली आहे. राज्यातील विविध भागात सकाळी आणि संध्याकाळी थंडी जाणवत असून राज्याच्या तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Share your comments