1. बातम्या

संपुर्ण देशात होणार बत्तीगुल! फक्त चार दिवस पुरेल एवढाच कोळसा त्यानंतर भारत राहणार अंधारात

भारतात जर समजा लाईट नसली तर! तुम्ही म्हणणार हे अशक्य आहे, पण नाही हे वास्तव आहे भारतात तीन-चार दिवसानंतर बत्तीगुल होणार आहे, वीज नसणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल नेमका हा माजरा आहे तरी काय? त्याच झालं असं आपल्या देशाकडे फक्त तीन ते चार दिवस विजनिर्मिती होईल एवढाच कोळसा शिल्लक आहे. ह्याची माहिती खुद्द केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानेच दिली आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
electricity

electricity

भारतात जर समजा लाईट नसली तर! तुम्ही म्हणणार हे अशक्य आहे, पण नाही हे वास्तव आहे भारतात तीन-चार दिवसानंतर बत्तीगुल होणार आहे, वीज नसणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल नेमका हा माजरा आहे तरी काय? त्याच झालं असं आपल्या देशाकडे फक्त तीन ते चार दिवस विजनिर्मिती होईल एवढाच कोळसा शिल्लक आहे. ह्याची माहिती खुद्द केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानेच दिली आहे.

ऊर्जा मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कोळशावर आधारित वीजनिर्मिती केंद्रांमध्ये कोळशाचा साठा खूपच कमी झाला आहे. मित्रांनो इथे लक्षात घेण्याची बाब म्हणजे देशातील 70 टक्के वीज निर्मिती केवळ कोळशाद्वारे केली जाते. सूत्राच्या माहितीनुसार, एकूण 135 औष्णिक ऊर्जा प्रकल्पांपैकी 72 मध्ये तीन दिवसांपेक्षा कमी कोळसा साठा शिल्लक आहे.  तर 50 वीज प्रकल्प असे आहेत जिथे आठ ते दहा दिवस कोळशाचा साठा आहे.

देश अंधारात जाऊ शकतो का? आणि हो तर कारण काय…?

भारतीय केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ह्या वीज संकटामागील प्रमुख कारणपैकी एक कारण कोरोनाचा काळ देखील आहे, कारण की कोरोनाच्या काळात देशात जे लॉकडाउन होत त्यामुळे कार्यालयीन काम घरातून केल जात होत म्हणजे वर्क फ्रॉम होमचा धिंगाणा होता तसेच अनेक इतर कामे केले जात होते आणि त्यामुळे ह्या काळात विजेचा प्रचंड वापर वाढला. दुसरे एक महत्वाचे कारण देखील सांगितले जात आहे ते म्हणजे प्रत्येक घराला वीज पुरवण्याचे सरकारचे लक्ष्य, यामुळे पूर्वीच्या तुलनेत विजेची मागणी लक्षणीय वाढली आहे.

उर्जा मंत्रालयाच्या एका आकडेवारीनुसार, ऑगस्ट-सप्टेंबर 2019 मध्ये विजेचा एकूण वापर दरमहा 10 हजार 660 कोटी युनिट होता. हा आकडा 2021 मध्ये दरमहा 12 हजार 420 कोटी युनिटपर्यंत वाढला आहे. ही आकडेवारी बघून आपल्याला विजेचा वापर किती जोराचा वाढलाय हे लक्षात आलं असेलच.

English Summary: coal deficiency arise india so can all india go to darkness Published on: 07 October 2021, 08:25 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters