शेतकऱ्यांच्या मागे लागलेली साडेसाती काही केल्याने कमी होताना दिसत नाही. आता अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तर दुसरीकडे खरीप हंगामात बोगस बियाणे आणि खतांचा सुळसुळाट राज्यात होताना दिसत आहे. बीडमध्ये मात्र, अजबच प्रकार समोर आला आहे. नामांकित खत कंपनीच्या नावाचा वापर करुन खत म्हणून चक्क कोळसा आणि वाळूच्या मिश्रणाची विक्री करण्यात आली होती.
आता याप्रकरणी थेट (High Court) उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात करण्यात आली होती. सध्या खरिपात दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढावले होते तर अशा बोगस खत विक्रीतूनही अनेकांचे नुकसान झाले आहे. खत विक्रीतून शेतकऱ्यांची फसवणूक अशा घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे आता या प्रकरणी नुकसान थांबवावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
लवकरात लवकर यावर तोडगा काढणे गरजेचे आहे. शिवाय खताची विक्री आणि वापर केल्यानंतर वास्तव बाहेर येत असल्याने होणारे नुकसान कोणी भरुन काढू शकत नाही. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात हा प्रकार घडला होता. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. माजलगावमध्ये तर खत म्हणून कोळसा आणि वाळूचे मिश्रण विकले गेले आहे. यामुळे याकडे लक्ष लागले होते.
ब्रेकिंग! सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला धक्का, 'या' जागांवर होणार ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका
या घटनांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान तर होणार आहेच पण व्यापाऱ्यांकडून केवळ पैसा कमावण्याच्या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. यामुळे कृषी विभागाला छापेमारी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शहरातील एका व्यापाऱ्याकडून तब्बल तीस पोते बोगस खत जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अशा अनेक बोगस कंपन्या सध्या समोर येत आहेत.
महत्वाच्या बातम्या;
'बांधावरुनच समजतात शेतकऱ्यांच्या समस्या, राजकारणाची वेळ नाही अन्यथा दरेकरांना...'
धनंजय मुंडे, पंकजा मुंडे , बबनराव पाचपुते यांच्या कारखान्यांना नोटिसा, रक्कम थकवल्याने आयुक्तांचा दणका
दोन कोटींहून जास्त रेशनकार्ड रद्द, मोदी सरकारच्या मोठा निर्णय..
Share your comments