पूर्व विदर्भात पावसाची शक्यता

Saturday, 15 December 2018 09:09 AM


मुंबई:
बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ निर्माण होण्याचे संकेत आहेत. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पूर्व विदर्भात (पूर्व-अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली) जिल्ह्यांत 16 ते 17 डिसेंबर रोजी ढगाळ वातावरणाचा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तविला आहे.

याचबरोबर गडचिरोलीगोंदियाभंडारानागपूरचंद्रपूर आणि पूर्व-यवतमाळ जिल्ह्यांतील काही भागात या दरम्यान पावसाची शक्यता असल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी वर्तविले आहे. या हवामानाच्या स्थितीमुळे पूर्व-विदर्भात धुक राहील आणि कमाल तापमानात घट होईल. राज्यातील इतर भागात 15 ते 17 रोजी काही प्रमाणात आभाळी वातावरण राहील. पूर्व-विदर्भातील शेतकऱ्यांनी या हवामानाच्या स्थितीनुसार नियोजन करावेअसे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

rain vidarbha हवामान पाऊस विदर्भ

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय




Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2019 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.