एकाच तासात बरसला 100 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस.देऊळगाव माळी व परिसरात 18 सप्टेंबर च्या रात्री साडेसात वाजता पासून ते नऊ वाजे दरम्यान ढगफुटी सदृश्य पाऊस बरसला. त्यामुळे देऊळगाव माळी महसूल मंडळात(जवळपास 17 गावातील) शेकडो हेक्टर वरील उडीद, मुंग, सोयाबीन,कपाशी या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. काही शेतामध्ये पाणी साचल्यामुळे पिकांची सुद्धा नासाडी
झाली. तर जमिनी सुद्धा खरडून गेल्या. त्याचबरोबर गावामध्ये अनेकांच्या घरात पाणी घुसून जीवनावश्यक साहित्याची नुकसान झाले.
हे ही वाचा - तुमची सोयाबीन पिवळी पडत आहे? त्यावरची ही आहेत कारणे आणि उपाय
घरात पाणी घुसल्यामुळे अनेकांना रात्र जागून काढावी लागली. म्हणजेच 18 सप्टेंबर ची रात्र म्हणजे वैऱ्याची रात्र ठरली. तसेच मेहकर देऊळगाव माळी मार्गावर असलेल्या लेंडी नदीला पूर आला होता त्यामुळे मेहकर ते साखरखेर्डा मार्गे जाणाऱ्या सर्व गावांचा
संपर्क काही कालावधी करता तुटलेला होता. तरी याच पुरामध्ये एक चार चाकी गाडी अडकून पडली होती परंतु गावकऱ्यांनी ती सुखरूप आहे. अशा या रौद्र रूप धारण केलेल्या पावसाने एका तासाभरात जिकडे तिकडे पाणीच पाणी करून दाना दान उडून टाकली व अतोनात नुकसान करून टाकणारा हा पाऊस होता. 100 मिलिमीटर पावसाची नोंद या महसूल मंडळात झाली आहे. या पावसामुळे
झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश मेहकर तहसीलचे तहसीलदार डॉक्टर संजय गरकळ यांनी संबंधित विभागाला दिले आहे. तसेच त्यांच्या सूचनेप्रमाणे देऊळगाव माळी व परिसरात कृषी पर्यवेक्षक मोरे साहेब, मंडळ अधिकारी राजेंद्र आव्हाळे, कृषी सहाय्यक सुहास गवई, व त्यांच्या टीमने 19 सप्टेंबर रोजी झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यांच्यासोबत सरपंच किशोर गाभणे, उपसरपंच रंगनाथ चाळगे, भरत बापू मगर, पत्रकार राजेश मगर, तंटामुक्ती अध्यक्ष केशव मगर, बबन
कापरे, यांच्यासह गावकरी मंडळी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना परिसरातील संपूर्ण नुकसानग्रस्त भाग दाखवला. नुसती पाहणी करून वा पंचनामा करून कागदपत्रे घोडे नाचू नये तर शेतकऱ्यांना सरसकट भरीव मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.शेतकरी प्रतिक्रिया - मी माझ्या आयुष्यामध्ये अशा स्वरूपाचा पाऊस अजून पर्यंत बघितला नाही असा रप रप पाऊस पडला. सगळीकडे पाणीच पाणी दिसत होते. या पावसाने पिकांचे खूप मोठे नुकसान झाले. शासन माय बापाने आम्हाला सरसकट मदत द्यावी.
शेतकरी प्रभाकर फलके , गोपाल गवई
Share your comments