शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अमरनाथ गुहेजवळ झालेल्या ढगफुटीत आतापर्यंत तीन महिलासह पंधरा जणांचा बळी गेल्याचे स्पष्ट झाले असून अद्यापही 35 ते 45 भाविका बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
जेव्हा ही घटना घडली तेव्हा अमरनाथ गुहेजवळ दहा ते पंधरा हजार भाविक उपस्थित होते. यामध्ये अडकलेल्या भाविकांना सध्या पंचतरणीला हलवण्यात येत असून हवाई दलातर्फे या ठिकाणी युद्धपातळीवर मदत व बचाव कार्य सुरू आहे. जी पवित्र गुहा आहे त्या गुहेपासून एक ते दोन किलोमीटरच्या परिसरात ढगफुटी झाली होती.
त्यामुळे डोंगरावरून आलेल्या जोरदार पाण्याच्या प्रवाहाने भाविकांसाठी उभारलेले पंचवीस तंबू आणि दोन ते तीन लंगर वाहून गेले.
याच्यामुळे झालेल्या पावसाने संपूर्ण परिसर जलमय झाला असून आणि भाविकांना त्याचा फटका बसला आहे. अनेक भाविक बेपत्ता असून पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
नक्की वाचा:राजकारणातील सर्वात मोठी बातमी! संजय राऊतांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
लष्कर आणि निमलष्करी दले बचावकार्यात
या घटनेनंतर लगेच जम्मू-काश्मीर पोलिसांची एक टीम सोबत आयटीबीपी,आर्मी, बीएसएफ, सीआरपीएफ, एनडीआरएफ आणि एस डी आर एफ च्या तुकड्यानी घटनास्थळी तात्काळ पोहोचून बचावकार्य सुरू केले आहे.
या बचाव कार्याबाबत एनडीआरएफचे डीजे अतुल करवाल यांनी सांगितले की, लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले जात असून त्यांना छावण्यांमध्ये हलवण्यात येत आहे.
या घटनेचे काही जखमी झाले आहेत त्यांना विमानाने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षात ठेवून असून त्यांनी तात्काळ जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज शर्मा यांच्याशी चर्चा केली. या घटनेबाबत त्यांनी दुःख व्यक्त केले असून पीडितांना सर्वतोपरी मदत देण्याचे निर्देश दिले.
नक्की वाचा:महावितरणचा नागरिकांना शॉक: महावितरणने वीज दरात केली मोठी वाढ, जाणून घेऊ नवीन दर
Share your comments