1. बातम्या

महावितरणचा नागरिकांना शॉक: महावितरणने वीज दरात केली मोठी वाढ, जाणून घेऊ नवीन दर

पेट्रोल आणि डिझेल तसेच स्वयंपाकाचा गॅस इत्यादी तर महागाईच्या उंबरठ्यावर पोहोचलेच आहेत, परंतु आता त्या पाठोपाठ राहिलेली कमी महावितरण ने कमी केली आहे. अगोदरच महागाईमुळे आर्थिक समस्यांचा सामना करत लागत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना महावितरणने विजेच्या दरात वाढ करून परत एक झटका दिला आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
electricity rate growth

electricity rate growth

पेट्रोल आणि डिझेल तसेच स्वयंपाकाचा गॅस इत्यादी तर महागाईच्या उंबरठ्यावर पोहोचलेच आहेत, परंतु आता त्या पाठोपाठ राहिलेली कमी महावितरण ने कमी केली आहे. अगोदरच महागाईमुळे आर्थिक समस्यांचा सामना करत लागत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना महावितरणने विजेच्या दरात वाढ करून परत एक झटका दिला आहे.

महावितरणने इंधन समायोजन आकारांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ केली असून त्यामुळे अगोदरच महागाईमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार आहे.

महावितरणने  इंधन समायोजन आकार मध्ये वाढ केल्यामुळे आता वीज ग्राहकांना जास्तीच्या आकाराने वीज खरेदी करावी लागणार आहे.

नक्की वाचा:Market Rate: 'आंबेमोहोर' तांदूळ वापरणे आवाक्याबाहेर? प्रति क्विंटल 1000 ते 1500 रुपये भाववाढ

त्यामुळे आता ग्राहकांच्या खिशाला आर्थिक फटका बसणार आहे. जर आपण  इंधन समायोजन आकारामध्ये वाढीसंदर्भात विचार केला तर जेव्हा कोळसा आणि इंधनाचे दर वाढतात त्यावेळी MERC च्या परवानगीने ही दरवाढ केली जाते.

जून महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत असलेल्या इंधन समायोजन दरामध्ये प्रचंड वाढ करण्यात आली आहे.

या समायोजन आकार वाढीचा विचार केला तर मार्च 2022 ते मे 2022 पर्यंत जो इंधन समायोजन आकार होता, त्याच्यापेक्षा काही अधिक पटीने सध्याचा इंधन समायोजन आकार वाढवण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात देखील प्रतियुनिट पंचवीस पैशांची वाढ महावितरणने केली होती.

नक्की वाचा:19 लाख शेतकऱ्यांना फायदा: 'स्मार्ट प्रकल्पा'ला गती देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

अशी आहे सध्याची दरवाढ

1- 0 ते 100 युनिट - आधी होते दहा पैसे आता झाले 65 पैसे

2- 101 ते 300 युनिट- याआधी होते 20 पैसे युनिट, आता झाले एक रुपये पंचेचाळीस पैसे युनिट

3- 301 ते 500 युनिट- या आधी होते 25 पैसे युनिट,  आता झाली दोन रुपये पाच पैसे युनिट

4- पाचशे एक युनिटच्या वर- आधी होते 25 पैसे पर युनिट आता झाले दोन रुपये पस्तीस पैसे युनिट

नक्की वाचा:Important:आता नाही बँकेचे उंबरे झिजवण्याची गरज,रब्बीपासून मिळेल शेतकऱ्यांना ऑनलाईन पीक कर्ज

English Summary: mahavitran growth in rate of electricity by high level Published on: 09 July 2022, 10:03 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters